एक्स्प्लोर

LSG vs DC, IPL 2023 Live : लखनौचा दिल्लीवर 50 धावांनी विजय

Lucknow Super Giants vs Delhi Capitals : लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज लढत होणार आहे. हा सामना लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रंगणार आहे.

LIVE

Key Events
LSG vs DC, IPL 2023 Live : लखनौचा दिल्लीवर 50 धावांनी विजय

Background

IPL 2023, Lucknow Super Giants vs Delhi Capitals : लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज लढत होणार आहे. हा सामना लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रंगणार आहे. मागील काही आयपीएलमध्ये दिल्लीने दमदार कामगिरी केली आहे. 2019, 2020 आणि 2021 मध्ये दिल्लीने लागोपाठ प्लेऑफमध्ये स्थान पटकावलेय. 2020 मध्ये दिल्लीचा संघ उप विजेता होता. 2022 मध्ये दिल्ली पाचव्या क्रमांकावर होता. दुसरीकडे लखनौ संघाने पदार्पणातच दमदार कामगिरी केली होती. लखनौच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, एकापेक्षा एक सरस खेळाडूमुळे लखनौ संघ मजबूत दिसत आहे. 

राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघ उतरणार मैदानात -

2022 मध्ये लखनौ संघाने पहिल्यांदा आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. पहिल्याच आयपीएल हंगामात लखनौ संघाने सर्वांना प्रभावित केले. राहुलच्या नेतृत्वात लखनौ संघाने प्लेऑफपर्यंत प्रवास केला होता. आता नव्या हंगामात नवी तयारीसह लखनौ संघ मैदानात उतरेल.. पण पहिल्या दोन सामन्यात दोन अनुभवी खेळाडूशिवाय लखनौ संघ मैदानात उतरणार आहे. राहुलसोबत सलामीची जबाबदारी पार पाडणारा क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज मोहसिन खान पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. गेल्या हंगामात या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. क्विंटन डी कॉक सध्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. दक्षिण आफ्रिका संघाने त्याला अद्याप रिलिज केलेले नाही. तर मोहसिन खान अद्याप पूर्णपणे फिट नाही. अशात लोकेश राहुल याच्यासोबत सलामीला निकोलस पूरन उतरण्याची शक्यता आहे. मिनी ऑक्शनमध्ये निकोलस पूरन याला लखनौ संघाने 16 कोटी रुपयात खरेदी केले होते. लखनौ सुपर जायंट्स संघात तीन प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहेत. क्रृणाल पांड्याशिवाय  मार्कस स्टॉयनिस आणि रोमारियो शेफर्ड यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. त्याशिवाय गोलंदाजीत  आवेश खान याच्यासोबत मार्क वूड वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तर फिरकी गोलंदाजीची धुरा रवी बिश्नोई याच्या खांद्यावर असेल. रवी बिश्नोई याने गेल्या हंगामात सर्वांनाच प्रभावित केले होते. 

लखनौ सुपर जायंट्स टीम - 

केएल राहुल (कर्णधार), आवेश खान, आयुष बडोनी, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), के गौतम, दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, काइल मेयर्स, अमित मिश्रा, मोहसिन खान, नवीन उल हक, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), रवी बिश्नोई, डेनियल सॅम्स, करण शर्मा, रोमारियो शेफर्ड, मार्कस स्टॉयनिस, स्वप्निल सिंह, जयदेव उनादकट, मनन वोहरा, मार्क वूड, मयंक यादव, यश ठाकुर, युद्धवीर सिंह 

ऋषभ पंतची कमी जाणवणार का?

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघ तुल्यबळ वाटतोय. वॉर्नर स्वत: विस्फोटक फलंदाजी करतो.. त्याशिवाय मिचेल मार्शही सध्या लयीत आहे. त्याशिवाय रिली रोसो, रोवमन पॉवेल आणि सरफराज खान यासारखे हार्ड हिटर दिल्लीच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय अक्षर पटेलसारखा तगडा अष्टपैलू खेळाडू संघाला अधिक संतुलीत करतो. गोलंदाजीत मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि चेतन सकारिया यांच्यासारखे भारतीय गोलंदाज आहेत. लखनौ विरोधात दिल्लीच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमीत कर्णधार ऋषभ पंत यंदाच्या हंगामासाठी उपलब्ध नाही. त्याजागी डेविड वॉर्नरकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या जागी पश्चिम बंगालचा विकेटकीपर अभिषेक पोरेल याला सामील करण्यात आलेय. एनरिक नॉर्किया आणि लूंगी एनगिडी पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत... ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. लवकरच ते दिल्लीच्या संघासोबत जोडले जाणार आहेत. कागदावर दिल्लीचा संघ मजबूत दिसतोय. 

दिल्लीच्या ताप्यात कोण कोण? 

रिली रोसो, मनीष पांडे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, फिल साल्ट, डेविड वार्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नॉर्किया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्ताफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्टवाल, अभिषेक पोरेल

23:27 PM (IST)  •  01 Apr 2023

काइल मेअर्सचा झंझावत अन् मार्क वूडच्या पाच विकेट, लखनौचा दिल्लीवर 50 धावांनी विजय

काइल मेअर्सची झंझावाती 73 धावांची खेळी अन् मार्क वूडची भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनौने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली. राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघाने दिल्लीचा 50 धावांनी पराभव केला. लखनौने दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने 9 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांपर्यंत मजल मारली. डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली.  लखनौकडून मार्क वूड याने भेदक मारा केला. मार्क वूड याने पाच विकेट घेतल्या. 

23:23 PM (IST)  •  01 Apr 2023

मार्क वूडचा धमाका, दिल्लीला दिला आणखी एक धक्का

मार्क वूडने घेतली पाचवी विकेट... दिल्लीची पराभवाकडे वाटचाल

23:19 PM (IST)  •  01 Apr 2023

अक्षर पटेल बाद, दिल्लीला आठवा धक्का

अक्षर पटेल बाद, दिल्लीला आठवा धक्का

23:02 PM (IST)  •  01 Apr 2023

दिल्लीची पराभवाकडे वाटचाल, कर्णधार डेविड वॉर्नर बाद

दिल्लीची पराभवाकडे वाटचाल, कर्णधार डेविड वॉर्नर बाद

22:57 PM (IST)  •  01 Apr 2023

दिल्लीला सहावा धक्का, अमन खान बाद

दिल्लीला सहावा धक्का, अमन खान बाद

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget