एक्स्प्लोर

IPL 2023: अटीतटीच्या लढतीत कोलकात्याचा पाच धावांनी विजय

IPL 2023, KKR vs SRH: अटीतटीच्या लढतीत कोलकात्याने हैदराबादचा पाच धावांनी पराभव केला.

IPL 2023, KKR vs SRH: अटीतटीच्या लढतीत कोलकात्याने हैदराबादचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह कोलकात्याने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. कोलकात्याने दिलेले १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने  २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १६६ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून कर्णधार एडन मार्करम याने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. 

कोलकात्याने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात सरासरी झाली. २९ धावांवर हैदराबादला पहिला धक्का बसला. मयंक अग्रवाल १८ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर लगेच अभिषेक शर्मा यानेही विकेट फेकली. अभिषेक शर्मा याने नऊ धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीलाही इम्पॅक्ट पाडता आला नाही. राहुल त्रिपाठी याने ९ चेंडूत २० धावांची खेळी केली. पावरप्लेमध्ये हैदराबाद संघाने तीन विकेट गमावल्या होत्या. हॅरी ब्रूक याला तर खातेही उघडता आले नाही. हैदराबादच्या ब्रूक याने कोलकात्याविरोधात मागील सामन्यात शतकी खेळी केली होती. ब्रूक याला आता भोपळाही फोडता आला नाही. अडचणीत सापडलेल्या हैदराबाद संघाला सावरण्यासाठी कर्णधार एडन मार्करम सरसावला.

एडन मार्करम आणि हेनरिक कालसन यांनी हैदराबादचा डाव सावरला. दोघांनीही सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप धारण केले.  दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत हैदराबादच्या विजयाच्या आशा उंचावल्या. पण शार्दूल ठाकूर याने ही जोडी फोडत कोलकात्याला सामन्यात आणले. हेनरिक कालसेन याने २० चेंडूत झटपट ३६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. एडन मार्करम याने संयमी फलंदाजी करत ४० चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. अब्दुल समद याने १८ चेंडूत २१ धावांची खेळी करत प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.  मार्को जानसन याने एका धावेची खेळी केली. भुवनेश्वर कुमार पाच धावांर नाबाद राहिला. 

कोलकात्याकडून शार्दूल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हर्षित राणा , आंद्रे रसेल, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

रिंकू-राणाची फटकेबाजी

IPL 2023, KKR vs SRH: कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांच्या खेळीच्या बळावर कोलकात्याने नऊ विकेटच्या मोबदल्यात १७१ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. रिंकू आणि राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. रिंकूने ४६ तर राणा याने ४२ धावांचे योगदान दिले. 

रिंकूची पुन्हा फटकेबाजी - 

रिंकू सिंह याने मोक्याच्या क्षणी वादळी फलंदाजी केली. पहिल्यांदा संयमी फलंदाजी केली. त्यानंतर अखेरीस धावा जमवल्या. रिंकू याने ४६ धावांची निर्णायाक खेळी केली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू बाद झाला. अब्दुल समद याने जबरदस्त झेल घेतला. रिंकू सिंह याने कर्णधार नीतीश राणा याच्यासमोबत ६१ धावांची महत्वाची भागिदारी केली. त्यानंतर रसेलसोबत झटपट धावा जोडल्या.

नीतीश राणा-रसेलची महत्वाची खेळी -

तीन विकेट झटपट गेल्यानंतर कर्णधार नीतीश राणा याने कोलकात्याचा डाव सावरला. रिंकूच्या मदतीने राणा याने कोलकात्याची धावसंख्या हालती ठेवली. नीतीश राणा याने रिंकूसोबत चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ६१ धावांची भागिदारी केली. राणा बाद झाल्यानंतर रिंकूने रसेलसोबत १८ चेंडूत ३१ धावांची भागिदारी केली. कर्णधार नीतीश राणा याने ३१ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये राणा याने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. तर आंद्रे रसेल याने १५ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. नीतीश राणा याला हैदराबादच्या कर्णधाराने बाद केले. तर रसेल याला मार्कंडेय याने तंबूचा रस्ता दाखवला.  अनुकूल रॉय याने अखेरीस सात चेंडूत नाबाद १३ धावांची खेळी करत इम्पॅक्ट पाडला. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले.

यांचा फ्लॉप शो - 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. गुरबाज याला खातेही उघडता आले नाही. गुरबाज जानसेनच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर यालाही जानसन याने तंबूचा रस्ता दाखवला. वेकंटेश अय्यर याने चार चेंडूत सात धावांची खेळी केली. दोन विकेटमधून कोलकात्याला सावरताच आले नाही. जेसन रॉय यानेही आपली विकेट फेकली. जेसन रॉय २० धावांवर बाद झाला. जेसन रॉय याने चार चौकाराच्या मदतीने २० धावांची खेळी केली. तीन विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू यांनी डाव सावरला. पण अखेरीस पुन्हा झटपट विकेट गेल्या. सुनील नारायण अवघ्या एका धावेवर बाद झाला. तर शार्दूल ठाकूर याला फक्त आठ धावांचे योगदान देता आले. हर्षित राणा धावबाद झाला... त्याला खातेही उघडता आले नाही. 

हैदराबादचा भेदक मारा - 

हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पावरप्लेमध्ये कोलकात्याच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. नटराजन २० व्या षटकात फक्त तीन धावा दिल्या. हैदराबादकडून मार्को जानसेन आणि नटराजन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडन मार्करम आणि मयांक मार्कंडेय यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget