Player Loan in IPL : फुटबॉलप्रमाणेच आयपीएलमध्येही दुसऱ्या संघाच्या खेळाडूंना कर्जावर घेता येणार, तात्पुरता कराराबाबत विचार सुरु
Player Loan in IPL 2023 : यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक संघातील खेळाडूंच्या दुखापतीशी झुंजत आहेत. तर अनेक संघ असे आहेत ज्यांच्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत हा नियम फायदेशीर ठरणार आहे.
New Rules in IPL : फुटबॉलप्रमाणेच (Football) आता आयपीएलमध्येही दुसऱ्या संघाचे खेळाडू कर्जाने म्हणजेच भाड्याने घेता येण्याची शक्यता आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये लिलावात संघ खेळाडूंचा समावेश करतात. तसेत काही संघ खेळाडूंची ट्रेडिंग अंतर्गत अदलाबदली करतात. पण फुटबॉलप्रमाणेच आता आयपीएलमध्येही खेळाडूंना कर्जावर संघात समाविष्ट केलं जाण्याची शक्यता आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) दरम्यान सध्या अनेक संघातील खेळाडूंना दुखापत झाली आहे. अनेक संघ खेळाडूंच्या दुखापतीमुळे अडचणीत आहेत. तर काही संघ असे आहेत ज्यामधील खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत हा नियम फायदेशीर ठरणार आहे.
फुटबॉलप्रमाणेच आयपीएलमध्येही खेळाडूंना कर्जावर घेणार
या परिस्थितीत आयपीएलमध्ये नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार एखादा संघ तात्पुरत्या करारावर दुसर्या संघाकडून खेळाडू कर्जाने घेऊ शकतो. खेळाडू बदलीच्या या पर्याय विचार सुरु आहे. हा नवा नियम लागू करण्याबाबत सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) विचार सुरु आहे. इतर देशातील कोणत्याही टी20 लीगमध्ये तात्पुरत्या कराराअंतर्गत खेळाडू बदलण्यास परवानगी नाही. मात्र, येत्या काळात हा नियम आयपीएलमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या संघाच्या खेळाडूंसोबत तात्पुरता करार
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात, अनेक संघ आपल्या खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहेत, तर अनेक संघ आहेत ज्यांच्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत आयपीएल संघ खेळाडूंना कर्जावर घेण्याचा विचार करत आहेत. हा नियम लागू झाल्यास संघ आयपीएल सुरु असताना मधल्या काळात इतर संघातील खेळाडूंना त्यांच्या संघाचा भाग बनवू शकतील. मात्र, हा करार कायमस्वरूपी नसून, तात्पुरता असेल. सध्या कोणत्याही टी 20 लीगमध्ये ते लागू होत नसले तरी येत्या काही दिवसांत त्यावर विचार केला जाऊ शकतो. तथापि, फुटबॉल लीगमध्ये असे घडते की संघ स्पर्धेच्या मध्यभागी इतर संघातील खेळाडू जोडू शकतात. तथापि, जेव्हा कर्जाचा कालावधी संपतो, तेव्हा खेळाडू त्यांच्या जुन्या फ्रेंचायझीकडे परत जातात.
Player on Loan Rule : प्लेअर ऑन लोन नियम काय आहे?
फुटबॉल खेळामध्ये प्लेअर ऑन लोन नियम लागू आहे. या नियमानुसार, एक संघ किंवा फ्रेंचायझी दुसऱ्या संघातील खेळाडू कर्जावर घेऊन त्याच्या संघात सामील करु शकते. पण हा करार तात्तुरता असतो. हंगाम संपल्यानंतर हा करार संपून खेळाडू मुळ संघाचा भाग असले. या नियमामुळे एखाद्या संघातील दुखापतग्रस्त खेळाडूची जागा भरण्यासाठी सं दुसऱ्या संघातील बेंचवरील खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी विचारणा आणि प्रयत्न करु शकते. दरम्यान, सध्या या नियमावर विचार सुरु आहे. मात्र, हा नया केव्हा लागू होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.