CSK vs GT IPL Final : 'कॅप्टन कूल' धोनी विरोधात कशी असेल गतविजेत्या पांड्याची प्लेईंग 11, जाणून घ्या
GT vs CSK IPL 2023 Final Match : आज गतविजेता गुजरात आणि चार वेळचा विजेता चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा अंतिम सामना रंगणार आहे.
IPL 2023 Final Match, CSK vs GT : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier league) यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामना आज, 28 मे रोजी खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. आजच्या सामन्यानंतर यंदाच्या मोसमातील विजेता मिळणार आहे. यंदाच्या मोसमात हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमाची सुरुवातही या चेन्नई आणि गुजरात यांच्या लढतीने झाली होती आणि आता शेवटही याच दोघांच्या सामन्याने होणार आहे.
चेन्नई विरुद्ध गुजरात महामुकाबला
आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला. गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला अंतिम सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान आहे. आयपीएल 2023 मधील 14 पैकी दहा सामने जिंकून गतविजेत्या गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) आयपीएल 2023 गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. तर चेन्नई सुपर किंग्स संघाने 14 सामन्यांपैकी आठ सामने जिंकून गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं.
चेन्नई विरुद्ध गुजरात हेड टू हेड आकडेवारी
गुजरात टायटन्सं संघाचं यंदाचं आयपीएलमधील दुसरं वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने विजेतेपदावर नाव कोरलं. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. यंदाही गुजरात आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले होते. यामध्ये दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. आतापर्यंत दोन्ही संघामध्ये चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने तीन तर चेन्नईने एका सामन्यात विजय मिळवलाय.
One step away 🎢
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2023
Chennai Super Kings and Gujarat Titans have had an eventful journey to #TATAIPL 2023 #Final 💯
As they get ready for the summit clash 🏆, take a look at the Road to the Final of the two teams 👌🏻👌🏻#CSKvGT | @ChennaiIPL | @gujarat_titans pic.twitter.com/Eq6YtwOpZY
गुजरात आणि चेन्नई तिसऱ्यांदा आमने-सामने
आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईनं गुजरातचा पराभव केला. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) गुजरात टायटन्स (GT) वर मात करत चेन्नई सुपर किंग्स (CSK) अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता.
CSK vs GT Probable Playing XI : संभाव्य प्लेइंग इलेव्हन
CSK Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महिषा तीक्षणा.
GT Probable Playing 11 : गुजरात टायटन्स
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णदार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, दासून शनाका, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.