IPL 2023 RR vs CSK : राजस्थानच्या विजयाच्या आनंदावर विरजण; स्लो ओव्हरमुळे संजू सॅमसनला लाखोंचा दंड
IPL 2023, RR vs CSK : सामना जिंकूनही राजस्थानच्या विजयाच्या आनंदावर विरजण पडले. कारण कर्णधार संजू सॅमसनला ( Sanju Samson) स्लो ओव्हर रेटमुळे लाखोंचा दंड ठोठावण्यात आलाय.
![IPL 2023 RR vs CSK : राजस्थानच्या विजयाच्या आनंदावर विरजण; स्लो ओव्हरमुळे संजू सॅमसनला लाखोंचा दंड IPL 2023 CSK vs RR Sanju Samson fined Rs 12 lakh for slow over rate IPL 2023 RR vs CSK : राजस्थानच्या विजयाच्या आनंदावर विरजण; स्लो ओव्हरमुळे संजू सॅमसनला लाखोंचा दंड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/08/ccbb1db142ffc86d10d80f58f79f13331680975252187428_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2023 RR vs CSK : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा 17वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात खेळला गेला. यंदाच्या मोसमातील आत्तापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना होता. सामन्यातील विजय-पराजयाचा निर्णय शेवटच्या चेंडूवर झाला. ज्यात राजस्थान रॉयल्सचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. खरंतर, शेवटच्या चेंडूवर सीएसकेला सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज होती. पण स्ट्राईकवर असलेल्या एमएस धोनीला (MS.Dhoni) एकच धाव करता आली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 8 विकेट गमावत 175 धावा केल्या. विजयासाठी 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSK संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 172 धावाच करू शकला. पण सामना जिंकूनही राजस्थानच्या विजयाच्या आनंदावर विरजण पडले. कारण कर्णधार संजू सॅमसनला ( Sanju Samson) स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
संजू सॅमसनला 12 लाखांचा दंड
राजस्थान रॉयल्स संघाला ठरलेल्या वेळेत लक्ष्य गाठता आलं नाही. त्यामुळेच कर्णधार संजू सॅमसनला ( Sanju Samson) संथ गतीने षटकं पूर्ण केल्याबद्दल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स संघावर लागलेला हा पहिलाच दंड आहे. राजस्थान संघाने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे आता कॅप्टन संजू सॅमसनला 12 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.
शेवटच्या चेंडूवर राजस्थानचा चेन्नईवर विजय
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा रॉयल पराभव केला. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 21 धावांची गरज होती. मैदानावर जगातील सर्वात मोठा फिनिशर धोनी आणि अष्टपैलू जाडेजा होते. धोनीने संदीप शर्माच्या षटकात दोन षटकार मारत सामना रंजक वळणावर आणला. पहिल्या तीन चेंडूवर सामना चेन्नईच्या बाजूने झुकला होता. पण संदीप शर्मा याने अखेरच्या तीन चेंडूवर सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. संदीप शर्मा याने यॉर्कर चेंडू फेकत धोनी आणि जाडेजा यांची बॅट शांत ठेवली. राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 172 धावांपर्यंत मजल मारु शकला. धोनी आणि जाडेजा यांनी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण संदीप शर्माच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. धोनीने या सामन्यात 17 चेंडूत 32 धावांची विस्फोटक खेळी केली. तर जाडेजाने 15 चेंडूत 25 धावांची खेळी केली. धोनी आणि जाडेजा यांनी 30 चेंडूत नाबाद 59 धावांची भागिदारी केली. पण या दोन्ही अनुभवी फलंदाजांना चेन्नईला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
राजस्थाननेचा चेपॉकमध्ये आणखी एक विक्रम
राजस्थानने घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव करून आणखी एक मोठा विक्रम नोंदवला आहे. गेल्या 10 वर्षात चेपॉक स्टेडिअमवर (CSK) पराभूत करणारा राजस्थान रॉयल्स (RR) हा दुसरा संघ ठरला आहे. या गेल्या 10 वर्षात फक्त मुंबई इंडियन्स संघाने चेपॉकवर चेन्नईला मात दिली आहे. मुंबई इतर कोणत्याही संघाला गेल्या 10 हंगामात चेपॉकवर चेन्नई विरुद्धचा सामना जिंकता आलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)