SRH vs GT : गुजरातचा आठ गड्यांनी पराभव, विल्यमसन-अभिषेक शर्माची दमदार फलंदाजी
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात आज गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) हा सामना पार पडणार आहे.
LIVE
Background
SRH vs GT, Live Updates : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 21 वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) या दोघांमध्ये पार पडत आहे. सध्या गुणतालिकेत तिसऱ्यास्थानी असणाऱ्या गुजरातने एकही सामना गमावला नसून हैदराबादने देखील शेवटच्या सामन्यात दमदार चेन्नई सुपरकिंग्सला मात दिली आहे. त्यामुळे आजचा सामना दमदार होणार यात शंका नाही.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना पार पडणाऱ्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत झालेल्या सामन्यात संघाकडून चांगला स्कोर होताना पाहायाला मिळत आहे. अगदी मोठा नाही तर अगदी कमीही नाही, आव्हानात्मक स्कोर उभा होत असल्याने सामने् चुरशीचे होत आहेत. त्यात आजचा सामना सायंकाळी सामना असल्याने लाईट आणि दवाच्या अडचणीमुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी घेऊन स्कोर चेस करण्याच्या प्रयत्नात असेल.
हैदराबादचे संभाव्य अंतिम 11
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, टी. नटराजन, कार्तिक त्यागी
गुजरातचे संभाव्य अंतिम 11
शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- KKR vs DC Top 10 Key Points : दिल्लीचा कोलकात्यावर 44 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- KKR vs DC Result : टेबल टॉपर केकेआर पराभूत, दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीकडून 44 धावांनी पराभव
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]
SRH vs GT : गुजरातचा आठ गड्यांनी पराभव
SRH vs GT : केन विल्यमसनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर हैदराबादने गुजरातचा आठ गड्यांनी पराभव केला.
SRH vs GT : हैदराबादला दुसरा धक्का, कर्णधार विल्यमसन बाद
SRH vs GT : कर्णधार केन विल्यमसनचं अर्धशतक
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने दमदार अर्धशतक साजरे केले आहे. हैदराबाद संघाला विजयासाठी 26 चेंडूत 35 धावांची गरज
SRH vs GT : राहुल त्रिपाठी रिटायर्ट हर्ट
SRH vs GT : राहुल त्रिपाठी 17 धावांवर रिटायर्ट हर्ट झाला आहे. हैदराबाद संघाला विजयासाठी 29 चेंडूत 46 धावांची गरज
SRH vs GT : विल्यमसनची कर्णधाराला साजेशी खेळी
SRH vs GT : हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याची कर्णधारपदाला साजेशी खेळी. 163 धावांचा पाठलाग करताना विल्यमसन 42 धावांवर खेळत आहे. हैदराबाद संघाला विजयासाठी 41 चेंडूत 59 धावांची गरज