IPL 2022: गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघानं जिंकली सर्वाधिक वेळा ट्रॉफी, पाहा आकडे
IPL 2022: आयपीएल 2022 मधील साखळी सामन्यानंतर आता प्लेऑफमध्ये चार संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
IPL 2022: आयपीएल 2022 मधील साखळी सामन्यानंतर आता प्लेऑफमध्ये चार संघ एकमेकांशी भिडणार आहेत. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सनं प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज पहिला क्वालीफायर सामना खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे.
2011 मध्ये आयपीएलमध्ये प्लेऑफ फॉरमॅट सुरू झाल्यापासून एकूण 11 आयपीएल सामन्यांमध्ये केवळ चार वेळा गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणारा संघ चॅम्पियन बनला आहे. आयपीएल 2011 मध्ये चेन्नईचा संघ प्रथम क्रमांकावर राहून चॅम्पियन बनला. यानंतर 2017 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईनं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर 2019 आणि 2020 मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ मुंबईनं विजेतेपद पटकावलं होतं.
गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावरील संघाची हवा
प्लेऑफच्या फॉर्मेटला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा संघ सर्वाधिक वेळा चॅम्पियन बनला आहे. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाच्या संघानं सहा वेळा विजेतेपद पटकावलं आहे. आयपीएल 2012 मध्ये कोलकाता, 2013 मध्ये मुंबई, 2014 मध्ये कोलकाता, 2015 मध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर होती. दोन्ही संघ चार वर्षांत दोनदा चॅम्पियन झाले होते. त्याच वेळी, 2018 आणि 2021 मध्ये चेन्नईनं दुसऱ्या क्रमांकावर राहून विजेतेपद पटकावलं होतं.
चौथ्या क्रमांकावरील संघाच्या हाती केवळ निराशा
प्लेऑफच्या फॉर्मेटला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकवर असलेल्या संघानं विजय मिळवला होता. सनरायजर्स हैदराबादनं 2016 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहून आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. विशेष म्हणजे, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचा खिताब जिंकता आला नाही.
हे देखील वाचा-