RCB vs RR, Match Live Updates : राजस्थानचा आरसीबीवर 29 धावांनी विजय
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही पुण्याच्या एमसीए मैदानात सामना पार पडत आहे.

Background
RCB vs RR, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) या दोन संघात सामना पार पडत आहे. दोन्ही संघाचा यंदाच्या हंगामातील (IPL 2022) फॉर्म दमदार असल्याने त्यांच्यातील आजचा सामनाही चुरशीचा होईल अशी आशा सर्व क्रिकेटरसिकांना आहे. गुणतालिकेचा विचार करता राजस्थानचा संघ 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे बंगळुरुचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचवं स्थान मिळवलं आहे. गुजरात नंतर राजस्थानची कामगिरी यंदा अतिशय उल्लेखनीय असून दुसरीकडे बंगळुरुचा संघ काही सामन्यात खराब कामगिरी केलेली वगळता कमाल फॉर्ममध्ये दिसून येत आहे. पै
आजवर रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे संघ तब्बल 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत. दरम्यान आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानात मागील काही सामने न झाल्यामुळे खेळपट्टी आज चांगली असल्याचं दिसून येत आहे. दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे त्यांचे सामने पुण्यातून मुंबईत घेण्यात आले. त्यामुळे काहीशा चांगल्या स्थितीत असणाऱ्या पुण्याच्या मैदानात आज होणारा सामना चुरशीचा होऊ शकतो. यंदाच्या हंगामात बहुतांश संघानी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना विजय मिळवला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
बंगळुरुचा संभाव्य संघ:
फाफ डु प्लेसीस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
राजस्थानचा संभाव्य संघ:
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.
हे देखील वाचा-
RCB vs RR, Match Live Updates : राजस्थानचा आरसीबीवर 29 धावांनी विजय
RCB vs RR, Match Live Updates :
रियान परागचे विस्फोटक अर्धशतक, कुलदीप सेन आणि अश्विनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 29 धावांनी पराभव केला.
RCB vs RR, Match Live Updates : आरसीबीला नववा धक्का, सिराज बाद
RCB vs RR, Match Live Updates :
सिराजच्या रुपाने आरसीबीला नववा धक्का बसला. सिराज पाच धावा काढून तंबूत परतला




















