RCB vs RR, Head to Head : बंगळुरु विरुद्ध राजस्थानमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL 2022 : आज पार पडणाऱ्या पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद सामन्यापूर्वी दोघांच्या एकमेंकाविरुद्धच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर...
RCB vs RR : यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी दमदार दिसून येत आहे. गुणतालिकेचा विचार करता राजस्थानचा संघ 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे बंगळुरुचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचवं स्थान मिळवलं आहे. दोघांचा फॉर्म चांगला असल्याने आजचा सामनाही रंगतदार होऊ शकतो, या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर फिरवूया...
बंगळुरु विरुद्ध राजस्थान Head to Head
आयपीएलमध्ये आजवर रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे संघ तब्बल 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत.
आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
बंगळुर - फाफ डु प्लेसीस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
राजस्थान - जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.
हे देखील वाचा-