Ravi Shastri On Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचा जबरदस्त फॉर्म पाहून रवी शास्त्री स्पष्टच बोलले, म्हणाले...
Ravi Shastri On Dinesh Karthik: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे.
Ravi Shastri On Dinesh Karthik: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीनं सात पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. या हंगामात आरसीबीचा मधल्या फळीचा फलंदाज दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) चांगलं प्रदर्शन केलंय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिनेश कार्तिकची कामगिरी पाहून भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) खूश झाले आहेत. तसेच आगामी टी-20 विश्वचषकात दिनेश कार्तिकचा भारतीय संघात समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
"मी सध्याचा फॉर्म आणि परिस्थितीनुसार जाईल. खेळाडूच्या फिटनेसचा विचार केला तर, दिनेश कार्तिक इतर खेळाडूंप्रमाणे फिट आहे. त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळेल, याची शक्यता कमी आहे. परंतु, तो संघाचा भाग असेल. मी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाकडं पाहत आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर कार्तिक चांगली कामगिरी बजावू शकतो", असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. दरम्यान, रवी शास्त्रीनं दिनेश कार्तिकला विश्वचषक संघात सामील करण्याची मागणी केली असली तरी, प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळणं कठीण मानलं जात आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीच्या संघानं त्याच्यावर बोली लावली. कार्तिकला 5.50 कोटीत विकत घेऊन आरसीबीनं त्याला संघात सामील केलं. फिनिशरची भूमिका साकारणाऱ्या कार्तिकनं आरसीबीनं दिलेल्या संधीचे सोनं केलं. कार्तिकनं आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये 210 धावा केल्या आहेत. या हंगामात अर्धशतक झळकावणारा कार्तिक सातपैकी सहा सामन्यांत नाबाद राहिला आहे. कार्तिकनं या मोसमात 200 हून अधिक स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- DD VS RR: संजू सॅमसनच्या विश्वासावर खरा उतरला 'हा' गोलंदाज, 19 वं षटक मेडन टाकून पलटवला सामना
- Rishabh Pant- Ms Dhoni: गुरू- शिष्य एकसारखेच! ऋषभ पंतच्या कृत्यामुळं आली धोनीची आठवण, नेमकं काय घडलं?
- DD vs RR: राजस्थान- दिल्ली सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! नो बॉलवरून कर्णधार ऋषभ पंत पंचांवर भडकला, पाहा व्हिडिओ