IPL 2022 : पर्पल कॅप कोणाकडं जाणार? चहल की हरसंगा दोघांमध्ये स्पर्धा
या हंगामातील पर्पल कॅप (Purple Cap) कोणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि आरसीबीचा वानिंदू हरसंगा यांच्यात स्पर्धा आहे.
IPL 2022 Orange and Purple Cap : आयपीएल 2022 (IPL 2022) ची अंतिम लढत ही राजस्थान राॉयल विरुद्ध हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे. हा सामना 29 मे रोजी होणार आहे. दरम्यान, या हंगामातील पर्पल कॅप (Purple Cap) कोणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाज वानिंदू हरसंगा (Wanindu Hasaranga) या दोघांमध्ये पर्पल कॅप मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, उद्या होणाऱ्या सामन्यात जर राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने विकेट घेतली नाही तर पर्पल कॅप त्याला मिळणार नाही. ही कॅप रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाज वानिंदू हरसंगा याच्याकडे जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सध्या चहल आणि हसरंगा यांच्या नावावर प्रत्येकी 26 विकेट आहेत. मात्र, बॉलिंग सरासरीचा विचार केला तर हसरंगा हा चहलच्या पुढे आहे. त्यामुळं उद्या होणाऱ्या शेवटच्या सामन्यात चहलला विकेट मिळवणे महत्वाचे ठरणार आहे. अन्यथा पर्पल कॅप मिळवण्याची संधी हुकू शकते.
या हंगामात सर्वात जास्त विकेट घेणारे टॉप- 5 गोलंदाज
गोलदांज | मॅच | विकेट | बॉलिंग एवरेज | इकनॉमी रेट |
वानिंदू हसरंगा | 16 | 26 | 16.53 | 7.54 |
युजवेंद्र चहल | 16 | 26 | 19.50 | 7.92 |
कगिसो रबाडा | 13 | 23 | 17.65 | 8.45 |
उमरान मलिक | 14 | 22 | 20.18 | 9.03 |
कुलदीप यादव | 14 | 21 | 19.95 | 8. 43 |
जोस बटलर ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी सज्ज
दरम्यान, दुसरीकडे ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी सज्ज जोस बटलर सज्ज झाला आहे. या मोसमात बटलरने आतापर्यंत 16 सामन्यांमध्ये 58.86 च्या फलंदाजीच्या सरासरीनं आणि 151.47 च्या स्ट्राइक रेटने 824 धावा केल्या आहेत. धावा करण्याच्या बाबतीत तो इतर फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे. बटलर पाठोपाठ लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुल आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी 500 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळं आता ऑरेंज कॅप आता बटलरकडे जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या: