(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PBKS vs SRH, Match Live Update : हैदराबादचा पंजाबवर विजय, सात गडी राखून दिली मात
IPL 2022 : आज नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडणार आहे. दोन्ही संघानी आतापर्यंत प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत.
LIVE
Background
PBKS vs SRH, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 28 वा सामना पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) या दोन संघामध्ये पार पडत आहे. दोन्ही संघानी यंदाच्या हंगामात आतापर्यंत समसमान कामगिरी केली असल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएलमध्ये आजवर पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद बंगळुरु (PBKS vs SRH) हे संघ तब्बल 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबने केवळ 5 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना दुपारच्या वेळेत होणार आहे, त्यामुळे उष्णता अधिक असल्याने दवाची अडचण अधिक होणार नाही. दवाची अडचण नसल्याने नाणेफेक आजच्या सामन्यात मोठा प्रभाव पाडणार नसल्याचं ही तज्ज्ञांचं मत आहे.
पंजाब अंतिम 11
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टोव्ह, प्रभसिमरन सिंह, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा, राहुल चाहर
हैदराबाद अंतिम 11
अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, शशांक सिंह, जगदीशा सुचित, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन
हे देखील वाचा-
- MI vs LSG, Top 10 Key Points : मुंबईचा पराभवांचा 'षटकार', लखनौचा 18 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- Andre Russell: पुन्हा आंद्रे रसलचं एका धावानं अर्धशतक हुकलं! त्याच्यासोबत किती वेळा असं घडलं? आकडा आश्चर्यचकीत करणारा
- DC vs RCB : कार्तिक-मॅक्सवेलची फटकेबाजी, हेजलवूडचा भेदक मारा, आरसीबीचा दिल्लीवर विजय
PBKS vs SRH : हैदराबादचा सात गडी राखून विजय
मार्करम आणि पूरनच्या उत्कृष्ट भागिदारीमुळे हैदराबादने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला आहे.
PBKS vs SRH : हैदराबादला विजयासाठी 4 षटकात 31 धावांची गरज
सामन्यातील अखेरची चार षटकं शिल्लक असून हैदराबादला विजयासाठी 31 धावांची गरज आहे. त्यांच्या हातात सात विकेट्ही आहेत.
PBKS vs SRH : अभिषेक शर्मा बाद
हैदराबादकडून सेट झालेला फलंदाज अभिषेक शर्मा 31 धावा करुन तंबूत परतला आहे. राहुल चाहरने त्याला बाद केलं आहे.
PBKS vs SRH : 10 षटकानंतर हैदराबाद 74/2
10 षटकानंतर हैदराबादने 74 धावांपर्यंत मजल मारली असून त्यांनी दोन विकेट्स गमावल्या आहेत. सघ्या मार्करम आणि अभिशेक फलंदाजी करत आहेत.
PBKS vs SRH : पंजाबला मोठं यश, राहुल त्रिपाठी बाद
हैदराबादकडून चांगली फलंदाजी करत असणाऱ्या राहुल त्रिपाठीची विकेट पडली आहे. 34 धावा करुन तो बाद झाला आहे. राहुलने त्याला बाद केलं आहे.