MI vs RR : मुंबईची प्रथम गोलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2022, MI vs RR : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आयपीएलमधील आजचा पहिला सामना होतोय.
IPL 2022, MI vs RR : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आयपीएलमधील आजचा पहिला सामना होतोय. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीनंतर सुर्यकुमार यादवचं संघात पुनरागमन होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र मुंबईने मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. तर राजस्थान संघाने एक बदल केला आहे. राजस्थानच्या संघात नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे.
राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11 : जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा
मुंबई इंडियंसचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंह, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टाइमल मिल्स, बसील थम्पी
A look at the Playing XI for #MIvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
Live - https://t.co/lPXtk37wjj #MIvRR #TATAIPL pic.twitter.com/G6wqXzCYPj
हेडू टू हेड रेकॉर्ड
मुंबईनं पाच वेळा आयपीएलचे खिताब जिंकले आहेत. तर, राजस्थानच्या संघानं आयपीएलच्या पहिल्या हंगामात ट्रॉफी जिंकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. शेनवार्नच्या नेतृत्वात राजस्थाननं ही ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर राजस्थानच्या संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत आयपीएलचे 27 सामने खेळण्यात आले आहेत. यातील 14 मुंबईनं तर, 12 सामन्यात राजस्थानच्या संघानं विजय मिळवला आहे. या दोघांमधील एकच सामना अनिर्णित ठरला होता. या दोघांमधील सामन्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यंदाचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live