6 अर्धशतके, एक शतक; मुंबईचा हिटमॅन कोलकात्याला पुन्हा चोपणार?
IPL 2022 Marathi News : कोलकात्याविरोधात नेहमीच रोहितच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. त्यामुळे कोलकात्याला विजय मिळवायचा असल्यास रोहित शर्माला लवकर बाद करावे लागले.
Rohit Sharma vs KKR in IPL : आयपीएलच्या 15 व्या हंगामात हिटमॅन रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्माला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. पण कोलकात्याविरोधात रोहित शर्मा मोठी खेळी करु शकतो. त्याला कारणही तसेच आहे. कोलकात्याविरोधात रोहित शर्माचा रेकॉर्ड भन्नाट आहे. रोहित शर्माने प्रत्येक सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. कोलकात्याविरोधात नेहमीच रोहितच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. त्यामुळे कोलकात्याला विजय मिळवायचा असल्यास रोहित शर्माला लवकर बाद करावे लागले.
कोलकात्याविरोधात रोहितची कामगिरी -
आयपीएलमध्ये रोहित शर्माने कोलकात्याविरोधात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. रोहित शर्माने कोलकात्याच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. रोहित शर्माने कोलकात्याविरोधात आतापर्यंत झालेल्या तीस सामन्यात सहा अर्धशतके आणि एका शतकांसह एक हजार 18 धावांचा पाऊस पाडलाय. रोहित शर्माने कोलकात्याविरोधात 44.26 सरासरीने आमि 130.51 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा कोलकात्याविरोधात चोपल्या आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माची कामगिरी -
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला यंदाच्या हंगामात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15 व्या हंगामात रोहित शर्माला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. रोहित शर्माने दहा सामन्यात 19.28 च्या सरासरीने आणि 128 च्या स्ट्राईक रेटने 198 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या 43 इतकी आहे. यंदा रोहित शर्माला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही.
मुंबई-कोलकाता हेड टू हेड रेकार्ड
आयपीएल 2022 चा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईतील डीवायपाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्स राखून पराभव केला. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स एकूण 30 सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सनं 22 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सला केवळ 8 सामन्यांमध्ये पराभव करता आला आहे