RCB vs CSK: चेन्नईसाठी 200 वा सामना खेळणार धोनी, आतापर्यंतच्या कामगिरीवर टाका एक नजर
IPL 2022: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2022 चा 49 वा सामना खेळला जाणार आहे.
IPL 2022: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore Vs Chennai Super Kings) यांच्यात आयपीएल 2022 चा 49 वा सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिह धोनीसाठी खास ठरणार आहे. आ चेन्नईसाठी महेद्रसिंह धोनी आज 200 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये धोनीची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली? यावर एक नजर टाकुयात.
चेन्नईसाठी 200 वा सामना खेळणार धोनी
आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून धोनी चेन्नईच्या संघाकडून खेळताना दिसत आहे. मात्र, मॅच फिक्सिंगमुळं चेन्नईवर बंदी घालण्यात आली. तेव्हा ते पुणे सुपरजायंट्सचा भाग होते. मात्र, दोन वर्षानंतर तो पुन्हा चेन्नईच्या संघात सामील झाला. धोनीने आतापर्यंत चेन्नईकडून खेळलेल्या 199 सामन्यांमध्ये 4312 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 40.37 होती. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं आयपीएलच्या चार ट्राफी जिंकल्या आहेत.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीची आयपीएलमधील एकूण कामगिरीही अप्रतिम राहिली आहे. त्यानं या स्पर्धेत एकूण 229 सामने खेळले असून 4886 धावा केल्या आहेत. धोनीनं आयपीएलमध्ये 24 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान नाबाद 84 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यामध्ये त्यानं एकूण 340 चौकार आणि 224 षटकार मारले आहेत. धोनीचा आयपीएलमधील स्ट्राईक रेट 135.72 इतका आहे.
विक्रमापासून धोनी 6 धावा दूर
महेंद्रसिंह धोनीनं आतापर्यंत 301 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 185 सामन्यात कर्णधार म्हणून त्यानं 5 हजार 994 धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्ध सामन्यात धोनीनं 6 धावा केल्यास, तो टी-20 क्रिकेटमधील 6000 धावांचा टप्पा पूर्ण करेल. कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरेल. याआधी विराट कोहलीनं कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमधील 6000 धावांचा टप्पा गाठला आहे.
हे देखील वाचा-
- ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
- RCB vs CSK: आरसीबीसाठी डोकेदुखी ठरलाय रवींद्र जाडेजा, पाहा हैराण करणारी आकडेवारी
- CSK vs RCB : आज आयपीएलमध्ये धोनीची फौज मैदानात, समोर बंगळुरुचं तगडं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?