विराट कोहलीला भारताच्या टी 20 संघातून डच्चू मिळणार? निवड समिती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
IND vs SA T20 Series : विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Indian Team for SA T20 Series South Africa Tour of India IND vs SA T20 Series : रनमशीन विराट कोहली मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीच्या फॉर्ममुळे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी चिंतेत आहेत. बीसीसीआयच्या सुत्रांनी InsideSport.In स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार, निवड समिती मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. विराट कोहलीला भारताच्या टी 20 संघातून डच्चू मिळू शकतो, यावर निवड समिती विचार करत आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'विराट कोहली भारताच्या महान खेळाडूपैकी एक आहे. पण मागील काही दिवसांपासून त्याचा फॉर्म निवड समिती आणि बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.' यावरुन विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या टी 20 मालिकेतून डच्चू मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
बीसीसीआय अधिकारी म्हणाला की, 'खेळाडूच्या निवडीमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. निवड समितीला विराट कोहली आणि अन्य खेळाडूंबाबद निर्णय घ्यावा लागेल. आम्ही त्यांना निर्णय सांगत नाही. विराट कोहलीही आपल्या फॉर्ममुळे चिंतेत असेल. विराट कोहलीबाबतचा निर्णय निवड समितीच घेईल.' विराट कोहली भारताचा सर्वोत्म खेळाडू आहे. पण त्याचा फॉर्म राष्ट्रीय निवड समितीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे, असेही अधिकारी म्हणाला.
"Virat Kohli is a Great servent of Indian cricket. But his form from sometime now is a huge concern now for the National selectors and BCCI." - The BCCI Official (To InsideSport)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) April 27, 2022
विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीची धावांचू भूक पाहून त्याला रनमशीनही म्हटले जाते. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीसारखा भरवशाचा फलंदाज दुसरा कुणीच नाही. पण मागील काही हंगामापासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून अखेरचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी आले होते. बांगलादेशविरोधात झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहलीला शतक झळकावता आलेलं नाही. आयपीएलमध्ये 2016 चा अपवाद वगळता त्यानंतर प्रत्येक हंगामात विराट कोहलीची बॅट शांतच राहिली आहे.
IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणार
भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक
भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं वेळापत्रक |
||||
क्रमांक
|
दिवस |
तारीख |
सामना |
ठिकाण |
1 |
गुरुवार |
9 जून |
1st T20I |
दिल्ली |
2 |
रविवार |
12 जून |
2nd T20I |
कटक |
3 |
मंगळवार |
14 जून |
3rd T20I |
वायजाग |
4 |
शुक्रवार |
17 जून |
4th T20I |
राजकोट |
5 |
रविवार |
19 जून |
5th T20I |
बेंगलरु |