IPL 2022 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 'जॉसचं बॉस', 'हा' युवा भारतीय करु शकतो ओव्हरटेक
IPL Purple Cap 2022 : यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर जोस बटलर अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 588 धावा ठोकल्या आहेत.
Orange Cap 2022 : आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. पण सध्यातरी ऑरेंज आणि पर्पल कॅपवर वरिष्ठ खेळाडूंचं वर्चस्व आहे. यामध्ये पर्पल कॅप राजस्थान संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्याकडे असून ऑरेंज कॅप ही राजस्थानच्याच जोस बटलर (Jos Buttler) याच्याकडे आहे. बटलरने 588 धावा केल्या असून आता बटलरला चुरशीची टक्कर भारताचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा देत आहे. अभिषेक सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 324 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान बटलरला मागे टाकण्यापूर्वी अभिषेक दिग्गज खेळाडू राहुल आणि धवन यांना मागे टाकू शकतो. अभिषेकने नऊ सामन्यात 324 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे आता अभिषेक शर्माला यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये शिखर धवन आणि राहुलचा विक्रम मोडण्याची संधी आहे. शिखर धवनने दहा सामन्यात 369 तर राहुलने 10 सामन्यात 451 धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे आणखी काही सामन्यांत तो या दोघांनाही मागे टाकू शकतो. या शर्यतीत केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही 324 धावा केल्या आहेत.
यंदाच्या हंगामात टॉप कामगिरी करणारे फलंदाज
क्रमांक | फलंदाज | सामने | धावा | फलंदाजी अॅव्हरेज |
1 | जोस बटलर | 10 | 588 | 65.33 |
2 | शिखर धवन | 10 | 451 | 56.38 |
3 | केएल राहुल | 10 | 369 | 46.13 |
4 | अभिषेक शर्मा | 9 | 324 | 36.00 |
5 | श्रेयस अय्यर | 10 | 324 | 36.00 |
हे देखील वाचा-
- IPL Purple Cap 2022 : फिरकीपटू युजवेंद्र चहल अजूनही पर्पल कॅप शर्यतीत अव्वल, पण हे गोलंदाज देत आहेत तगडं आव्हान
- RCB vs CSK, Top 10 Key Points : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?