(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs KKR, Toss Update : कोलकात्याने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी, केकेआरचा महत्त्वाचा गोलंदाज दुखापतग्रस्त; पाहा आजची अंतिम 11
IPL 2022 : कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
LSG vs KKR : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 53 वा सामना पुण्यातील एमसीए मैदानात खेळवला जात आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) या दोन संघात पार पडणाऱ्या या सामन्यात केकेआरने नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याच निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या हंगामात लखनौने 10 पैकी 7 सामने जिंकल्याने 14 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आजचा विजय त्यांना पुढील फेरीचं तिकीट मिळवून देऊ शकतो. तर दुसरीकडे कोलकाता संघाने 10 पैकी 4 सामने जिंकल्याने 8 गुणांसह आठव्या स्थानी आहेत. त्याचं पुढील फेरीत पोहोचणं अवघड असलं तरी त्यांना विजय महत्त्वाचा असल्याने आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा गोलंदा उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. लखनौ सुपरजायंट्सने देखील त्यांच्या संघात एक बदल केला असून वेगवान गोलंदाज आवेश खानला पुन्हा संघात घेण्यात आलं असून अष्टपैलू कृष्णपा गौथमला विश्रांती देण्यात आली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
लखनौ अंतिम 11
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, दीपक हुडा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुश्मंता चमिरा, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई
कोलकाता अंतिम 11
आरोन फिंच, नितीश राणा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नारायण, बाबा इंद्रजीत, अनुकूल रॉय, टिम साउदी, हर्षित राणा, शिवम मावी
हे देखील वाचा-