एक्स्प्लोर

IPL 2022 : ठुकरा के मेरा प्यार...या खेळाडूंना सोडल्याचा संघाना होतोय पश्चाताप 

IPL 15 : आयपीएलच्या यंदाच्या 15 व्या (IPL 2022) हंगामापूर्वी महालिलाव पार पडला होता. या लिलावांत सर्व संघात विविध बदल झाले असून अनेक स्टार खेळाडूंनी संघ बदलले.  

IPL 2022 : आयपीएल (IPL 2022) स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात 8 जागी 10 संघ खेळत असून नव्याने दोन संघ सामिल झाल्याने सर्वच संघामध्ये बरेच बदल झाले आहेत. अनेक स्टार खेळाडूंचे संघ बदलले असून कर्णधारासह बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. बऱ्याच खेळाडूंना त्यांच्या संघाने रिटेन केले नाही तसेच लिलावातही विकत घेतले नाही. त्यामुळे त्यांना नव्या संघात जावे लागले, दरम्यान अशाच काही खेळाडूंनी नव्या संघात जात कमाल कामगिरी करत आपल्या जुन्या संघाला त्यांना गमावण्याचा पश्चाताप करायला लावला आहे.यातीलच काही महत्त्वाच्या खेळाडूंची यंदाच्या हंगामातील कारकिर्द पाहू...

डेव्हिड वॉर्नर

हैदराबादला 2016 साली आयपीएलचा चषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या डेव्हिडचा 2021 साली खराब फॉर्म असल्यामुळे त्याला संघातून बाहेर ठेवण्यात आलं. ज्यानंतर 2022 ला रिटेन तर नाहीच उलट त्याला लिलिवातही हैदराबादने विकत घेतलं नाही. त्यानंतर दिल्लीने त्याला 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. ज्यानंतर वॉर्नरने दमदार कामगिरी केली असून आतापर्यंत 52.17 च्या शानदार सरासराने त्याने 313 रन केले आहेत. यावेळी त्याने तीन अर्धशतकंही ठोकली आहेत. 

युजवेंद्र चहल 

रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाचा मुख्य फिरकीपटू असणाऱ्या चहलला यंदा संघाने पुन्हा रिटेन केले नाही. त्यांना एक स्फोटक फलंदाजी करणारा फिरकीपटू हवा होता. या कारणामुळे चहलला गमावल्यानंतर बंगळुरुला आता मात्र याचा पश्चाताप होत आहे. कारण चहलने यंदा राजस्थान संघाकडून अगदी उत्तम कामगिरी सुरु ठेवली आहे. त्याने आतापर्यंत 11 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही अव्वल आहे. 

जोश हेजलवुड 

2021 मध्ये चेन्नई संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदाज जोश हेजलवुडने दिलं. पण 2022 साली त्याला संघात न घेतल्याने चेन्नईला आता मात्र पश्चाताप करावा लागत आहेत, बंगळुरु संघाने हेजलवुडला सामिल केलं आहे. त्याने या हंगामात 7 सामन्यात 17.36 च्औया सरासरीने 11 विकेट्स घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीला चेन्नई नक्कीच मिस करत असेल.

कुलदीप यादव

कोलकाता संघाने एक नाही तर सलग दोन वर्षे कुलदीप यादवला बेंचवर बसवून ठेवलं. या दरम्यान त्याची दुखापत कारणीभूत होतीच, पण तरी त्याला यंदा नक्कीच संधी देता आली असती. असं असतानाही केकेआरने यंदा कुलदीपला संघात पुन्हा घेतलं नाही, दिल्लीने त्याला आपल्या ताफ्यात सामिल केलं आणि कुलदीपने या संधीचा पुरेपुर फायदा देखील उचलला. कुलदीपने आतापर्यंत 10 सामन्यात 18  विकेट्स घेतल्या आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

हार्दिक पांड्या 

या यादीतीतल शेवटचं नाव म्हणजे स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. मुंबईचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या हार्दिकने यंदा लिलावापूर्वीच नव्याने सामिल झालेल्या गुजरात संघाचा कर्णधार होत मुंबईची साथ सोडली. ज्यानंतस आता मात्र तो अतिशय दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत 10 सामन्यात 333 धावा ठोकल्या असून कर्णधार म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने तीन अर्धशतकंही ठोकली आहेत.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हेOld Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Nikita Dutta Viral Photo : नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
नजरेचा नखरा नथीचा तोरा! बॉलिवूड अभिनेत्री निकीता दत्ताचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी विवेक कोल्हेंचा मोठा दावा
'छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय'; निकालाआधी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा मोठा दावा
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?
नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, ठाकरे गटाचा आक्षेप, नेमकं कारण काय?
Embed widget