(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT vs PBKS, Toss Update : हार्दिकची फौज प्रथम फलंदाजीसाठी सज्ज; नाणेफेक जिंकत घेतला निर्णय, पाहा आजची अंतिम 11
गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली आहे. त्यांनी याआधीही असा निर्णय घेऊन सामना जिंकला होता.
GT vs PBKS : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 48 वा सामना आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स संघ आणि पंजाब किंग्स (GT vs PBKS) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शक्यतो सर्व संघ प्रथम गोलंदाजी घेत असतात. सायंकाळी सामना असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना दवाची अडचण होत असल्याने हा निर्णय़ संघ घेतात. पण हार्दिकने मात्र फलंदाजीचा धाडसी निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे गुजरातचे खेळाडू एक मोठी धावसंख्या निर्माण करुन पंजाबवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार असल्याचं दिसून येत आहे.
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता पंजाब किंग्सने एकही बदल न करता मागील सामन्यात खेळवलेला तोच संघ आजही खेळवला आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ देखील कमाल फॉर्ममध्ये असल्याने त्यांनी संघात कोणतेही बदल केलेले नाहीत. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
गुजरात अंतिम 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, प्रदीप सागवान, मोहम्मद शमी
पंजाब अंतिम 11
मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा
हे देखील वाचा-
- KKR Vs RR: नितीश राणा, रिंकू सिंहची दमदार कामगिरी; कोलकात्याचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय
- IPL 2022 : आयपीएल 2022 चे 47 सामने आटोपले; 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, वाचा संपूर्ण संघाचं गणित?
- KKR vs RR : हातावर आधी 50 लिहिलं, मैदानात उतरुन मॅचविनर ठरला, रिंकू सिंहच्या भविष्यवाणीचा Video