IPL 2022, GT vs SRH : आजची लढत गुजरात विरुद्ध हैदराबाद; कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : आज मुंबईत्या प्रसिद्ध अशा वानखेडे मैदानात गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघामध्ये सामना पार पडणार आहे.
![IPL 2022, GT vs SRH : आजची लढत गुजरात विरुद्ध हैदराबाद; कधी, कुठे पाहाल सामना? IPL 2022, GT vs SRH : When & Where To Watch Live Streaming, Telecast Of Gujrat Titans vs sunrisers hyderabad IPL 2022, GT vs SRH : आजची लढत गुजरात विरुद्ध हैदराबाद; कधी, कुठे पाहाल सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/0d41d999e1d4af19e1203e4a4cbc7cdc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
GT vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असणारा गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. दरम्यान गुजरात विरुद्ध हैदराबाद (Gujrat Titans vs sunrisers hyderabad) हा सामना यंदाच्या हंगामातील 40 वा सामना असून गुजरातचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित असून त्यांनी आजचा विजय मिळवल्यास ते प्लेऑफच्या आणखी एक पाऊल पुढे पोहोचतील. दुसरीकडे सात पैकी पाच सामने जिंकल्याने त्यांचं आव्हान देखील गुजरातला तितकचं कठीण असून त्यांचेही पुढील फेरीत पोहोचण्याचे चान्सेस तितकेच आहेत. दरम्यान दोन्ही संघाना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजचा सामना महत्त्वाचा असल्याने आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.
आज होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) या सामन्यात दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. दोन्ही संघानी आतापर्यंत हंगामात चांगली कामगिरी केली असल्याने आजचा सामना पाहण्याजोगा असेल. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 27 एप्रिल रोजी होणारा गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईत्या प्रसिद्ध अशा वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)