एक्स्प्लोर

CSK IPL : धोनीच्या चेन्नईच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

CSK vs MI, IPL 2022 : नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात चेन्नईचे दोन फलंदाज माघारी परतले होते.

CSK vs MI, IPL 2022 Marathi News : तिलक वर्माच्या 34 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने चेन्नईवर पाच गड्यांनी विजय मिळवलाय. कर्णधार एमएस धोनीच्या 36 धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नईने दिलेल्या 98 धावांच्या आव्हानाचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 14.5 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. डॅनिअल सॅम्स आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार झाले. या सामन्यात चेन्नईच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात चेन्नईने पावरप्लेमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट गमावल्या आहेत. 

नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात चेन्नईचे दोन फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर पावरप्ले संपण्याआधी अर्धा संघ तंबूत परतला होता. सहाव्या षटकामध्ये पाच गडी गमावत चेन्नईने 32 धावे केल्या होत्या. यंदाच्या आयपीएलमधील चेन्नईची ही सर्वात खराब सुरुवात होती. 

मुंबईच्या गोलंदाजीपुढे चेन्नईची फंलदाजी ढासळली होती. धोनीचा अपवाद वगळता एकाही पलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईचा संपूर्ण संघ 20 षटकेही फलंदाजी करु शकला नाही. 16 व्या षटकात चेन्नईचा संपूर्ण संघ 97 धावांत बाद झाला. धोनीने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. धोनीच्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने 97 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईची ही दुसरी निचांकी धावसंख्या आहे. याआधी 2013 मध्ये चेन्नईने मुंभईच्याच विरोधात 79 धावा केल्या होत्या. ही चेन्नईची सर्वात निचांकी धावसंख्या आहे. धोनीच्या फंलदाजीच्या जोरावर चेन्नईने सर्वात निचांकी धावसंख्या होण्याचा विक्रमा हुकवला.. पण दुसरी सर्वात निचांकी धावसंख्या वाचवू शकला नाही. 

आयपीएलमधील चेन्नईची सर्वात निचांकी धावसंख्या - 
79 विरुद्ध मुंबई, वानखेडे स्टेडिमय- 2013
97 विरुद्ध मुंबई, वानखेडे स्टेडिमय- 2022
109 विरुद्ध राजस्थान, जयपूर- 2008
109 विरुद्ध मुंबई, चेपॉक- 2019

चेन्नईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात -
चेन्नईचा आठवा पराभव झालाय. या पराभवासह चेन्नईचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय. मुंबईनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचे आव्हानं संपुष्टात आलेय. मुंबईचे याआधीच स्पर्धेतील आव्हान संपलेले आहे. मुंबईने जाता जाता चेन्नईचीही वाट लावली...चेन्नई आतापर्यंत आयपीएलचे 13 हंगाम खेळली आहे. यापैकी 11 वेळा ते प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. 2020 आणि 2022 मध्ये चेन्नई प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. याआधी प्रत्येक हंगामात चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.  चेन्नई तब्बल 11 वेळा प्लेऑफमध्ये पोहचली आहे. यापैकी तब्बल चार वेळा चेन्नईने आयपीएल चषक उंचावलाय.  पाच वेळा चेन्नई उपविजेता राहिली आहे. तर दोन वेळा सेमीफायनलपर्यंत धडक मारली. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघ प्लेऑफमध्ये नसण्याची ही दुसरी वेळ होय. 2020 मध्ये चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचता आले नव्हते, त्यानंतर आता चेन्नईचे आव्हान संपुष्टात आलेय. पाच वेळा आयपीएल चषक विजेता मुंबई आणि चार वेळा चषक जिंकणारा चेन्नई संघ यंदा प्लेऑफमध्ये दिसणार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget