David Warner: अर्रर्रर्र... काय म्हणायंच या शॉटला? डेविड वार्नरचा व्हिडिओ व्हायरल
David Warner Video Viral: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 50 व्या सामन्यात दिल्लीच्या संघानं सनरायजर्स हैदराबादला 21 धावांनी धुळ चारली.
David Warner Video Viral: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 50 व्या सामन्यात दिल्लीच्या संघानं सनरायजर्स हैदराबादला 21 धावांनी धुळ चारली. या विजयासह दिल्लीच्या संघान आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. याचं संपूर्ण श्रेय दिल्लीचा सलामीवीर डेविड वार्नरला जात आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यात डेविड वार्नरनं वादळी नाबाद 92 धावांची खेळी केली. ज्यामुळं दिल्लीच्या संघानं 20 षटकात हैदराबादसमोर 208 धावांचं विशाल लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 186 धावाचं करू शकला. दरम्यान, सोशल मीडियावर डेविड वार्नरनं मारलेल्या एका शॉटची चर्चा रंगली आहे. डेविड वार्नरचा शॉट पाहून सर्वंच हैराण झाले आहेत.
आस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेविड वार्नर डावखुरा फलंदाज आहे. परंतु, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर उजव्या हातानं चौकार मारला. त्याचा हा शॉट पाहून खेळाडूंसह मैदानात बसलेले प्रेक्षकही हैराण झाले आहेत. सामन्यानंतर डेविड वार्नरच्या या शॉटचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. वार्नरनं हैदराबादविरुद्ध नाबाद 92 धावांची खेळी केली. परंतु, चेंडू शिल्लक न राहिल्यानं त्याला शतक पूर्ण करता आलं नाही.
दिल्लीच्या डावात भुवनेश्वर कुमार 18 वं षटक टाकायला आला होता. यादरम्यान वॉर्नर स्ट्राइकवर होता. भुवीनं या षटकातील पहिला चेंडू वॉर्नरच्या पायाजवळ टाकला. ज्यामुळे वार्नर मोठा शॉट खेळू शकला नाही. पण त्याचवेळी वॉर्नरनं भूमिका बदलली आणि उजव्या हातानं बॅट स्विंग करताना चौकार मारला. हे पाहून भुवी आश्चर्यचकित झाला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीनं 20 षटकांत 3 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. यादरम्यान वॉर्नरनं संघासाठी 92 धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानं 58 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून केवळ 186 धावांपर्यंत मजल मारता आली.
हे देखील वाचा-