IPL 2021, Video : केवळ 33 धावांवर बाद झाल्यावर विराटला राग अनावर, बॅटनं पाडली खुर्ची; व्हिडीओ होतोय व्हायरल
विराटसेनेच्या बंगळूरुने हैदराबादवर सहा धावांनी मात केली. पण कालच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. अशातच विराट बाद झाल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IPL 2021 : बुधवारी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीनं हैदराबादवर मात करत विजय मिळवला. या रोमांचक सामन्यात शेवटी आरसीबीचा विजय झाला. परंतु, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याची रिअॅक्शन सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. कालच्या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय आरसीबीनं घेतला. बंगलोरच्या फलंदाजांनी उत्तम खेळी केली. परंतु, कर्णधार विराट कोहली फारशी चांगली खेळी करु शकला नाही. विराट केवळ 33 धावांवर माघारी परतला. हैदराबादच्या जेशन होल्डरने विराटला माघारी धाडलं. पवेलियनमध्ये परतताना विराट कोहलीने रागात बॅटने खुर्ची पाडली. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये विराट आऊट झाल्यानंतर रागात दिसून येत आहे. तसेच तो पवेलियनमध्ये परतल्यावर आपल्या बॅटनं एक खुर्ची जोरात पाडताना दिसतोय. विराटच्या आजूबाजूला टीममधील इतर खेळाडू आहेत. पण कोणीच विराटकडे येताना दिसत नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. तर या व्हिडीओवर नेटकरीही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, "विराटला आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल." आणखी एका युजरने लिहिलं आहे की, "विराटने सांभाळून खेळायला हवं होतं." तसेच एका युजरने विराटच्या कर्णधार पदाचं कौतुक केलं. त्याने लिहिलं आहे की, "शेवटी विजय आरसीबीचाच झाला आणि विराटने या सामन्यात कर्णधार म्हणून उत्तम काम केलं."
बंगळुरूची हैदराबादवर 6 धावांनी मात
विराटसेनेच्या बंगळूरुने हैदराबादवर सहा धावांनी मात केली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या झुंझार अर्धशतकाच्या बळावर बंगळुरुनं 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या होत्या. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर 143 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरू आणि हैदराबादमधील आयपीएल सामन्यात हैदराबादनं बंगळुरुला 149 धावांवर रोखले. ग्लेन मॅक्सवेलच्या झुंझार अर्धशतकाच्या बळावर बंगळुरुनं 20 षटकात 8 बाद 149 धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादने बंगळुरूला दीडशेच्या आत रोखले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :