IPL 2021 | कोलकात्याच्या पराभवानंतर शाहरुख खान नाराज, चाहत्यांची मागितली माफी
IPL 2021 : मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात मुंबईने कोलकात्याला धुळ चारली. त्यावर संघाचा मालक शाहरुख खान नाराज झाला असून त्याने सोशल मीडियावर चाहत्यांची माफी मागितली आहे.
कोलकाता : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे क्रिकेट वेड लपून राहिलं नाही. मंगळवारी त्याच्या मालकीचा संघ असलेल्या कोलकाताला मुंबईने पराभवाची धुळ चारली. त्यावर आता शाहरुख खान भलताच नाराज झाला आहे. कोलकात्याच्या पराभवानंतर त्या संघाचे चाहतेही प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे आता शाहरुख खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून संघाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.
शाहरुखची माफी
या सामन्यानंतर शाहरुख खानने एक ट्वीट केलं आणि संघाच्या चाहत्यांची माफी मागितली. त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, कमीत कमी शब्दात सांगायचं तर निराशाजनक प्रदर्शन. मी संघाच्या सर्व चाहत्यांची माफी मागतो.
Disappointing performance. to say the least @KKRiders apologies to all the fans!
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 13, 2021
मंगळवारी मुंबई आणि कोलकाता संघाच्या दरम्यान सामना झाला. त्यामध्ये मुंबईने कोलकात्यासमोर केवळ 153 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाला केवळ 142 धावांपर्यंत मजल मारता आली आणि त्यांचा दहा धावांनी पराभव झाला.
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 36 चेडूंत सर्वाधिक 56 धावा केल्या, त्यात दोन षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. रोहित शर्माने 32 चेंडूत 43 धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि एक षटकार होता. तर हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्याने प्रत्येकी 15 धावा केल्या. मुंबईच्या इतर खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.
त्याआधी चांगली सुरुवात केलेल्या मुबंईला 15 व्या ओव्हरनंतर गळती लागली. कोलकाताच्या आंद्रे रसेलच्या गोलंदाजीपुढे मुंबई इंडियन्सचे फलंदाजांनी लोटांगण घाटलं. आंद्रे रसेलने 18व्या षटकात स्पेल सुरु केला आणि खऱ्या अर्थाने कोलकातासाठी तो टर्निंग पॉईंट ठरला. रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद केलं. रसेलने दोन षटकात 15 धावा देत 5 विकेट घेतल्या घेतले.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Lockdown : केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांचीच राज्य सरकारकडून पॅकेज म्हणून घोषणा; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
- CBSE Board Exam 2021 : सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार? पंतप्रधानांची दुपारी शिक्षणमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक
- Qatar Drug Case | कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात बळीचा बकरा बनलेलं भारतीय दाम्पत्य दोन वर्षानंतर मुंबईला परतणार