IPL 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात मोठा बदल होण्याची शक्यता
आरसीबीने 14 व्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल आणि जेम्सनसारख्या दिग्गज खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या हंगामात या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.
IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अजूनही त्यांच्या पहिल्या विजेतेपदाची वाट पाहत आहे. 14 व्या हंगामात नवीन खेळाडूवर विश्वास दाखवल्यानंतर आरसीबी आणखी एक बदल करणार आहे. 14 व्या मोसमात विराट कोहलीची टीम न्यू जर्सीमध्ये दिसणार आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आरसीबी आपल्या नवीन जर्सी सर्वांसमोर आणू शकते. आरसीबीची नवीन जर्सी कशी असेल याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत आरसीबीचे खेळाडू रेड जर्सीमध्ये मैदानात उतरायचे. प्रत्येक स्पर्धेत एका सामन्यात आरसीबीचे खेळाडू ग्रीन जर्सीमध्ये देखील दिसतात.
IPL 2022: पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होणार, दोन संघासाठी मे महिन्यात लिलाव
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात बदल
आरसीबीने 14 व्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल आणि जेम्सनसारख्या दिग्गज खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. मात्र लिलावानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेत या दोन्ही खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती.
IPL 2021: RCB चा 'हा' खेळाडू यंदाच्या सीजनमधून बाहेर
पंजाब संघाचे नाव बदलले
आरसीबी हा पहिला संघ नाही जो 14 व्या हंगामात बदल करत आहे. प्रीती झिंटाचा संघ किंग्स इलेव्हन पंजाबनेही या हंगामापूर्वी नाव बदलून पंजाब किंग्ज केले आहे. पंजाब किंग्जचे खेळाडू 14 व्या मोसमात नवीन जर्सीमध्येही येऊ शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं संपूर्ण शेड्यूल (IPL 2021 Royal Challengers Bangalore Full Schedule)
- 9 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 14 एप्रिल, बुधवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी, चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 18 एप्रिल, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
- 22 एप्रिल, गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्
- 25 एप्रिल, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी मुंबई : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 27 एप्रिल, मंगळवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 30 एप्रिल, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 3 मे, सोमवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 6 मे, गुरुवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स
- 9 मे, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
- 14 मे, शुक्रवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
- 16 मे, रविवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- 20 मे, गुरुवार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियंस
- 23 मे, रविवार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स