IPL 2021: कोविड 19 चा कडक प्रोटोकॉल असूनही रोहित शर्मा म्हणतोय मी नशीबवान
IPL 2021: कोरोना विषाणूच्या साथीमुळे खेळाडूंना बायो बबलमध्ये टिकून राहणे खूप कठीण आव्हान आहे. पण रोहित शर्माने स्वत:ला नशीबवान असल्याचे सांगितले आहे.
IPL 2021: कोरोना व्हायरस महामारीचा कहर सुरु असताना इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमाची आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात पाच वेळाचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. कोविड 19 चा कडक प्रोटोकॉल असूनही आयपीएल स्पर्धा होत असल्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला लकी म्हणत आहे.
रोहित शर्मा म्हणतोय की बायो बबलच्या बाहेर बऱ्याच लोकांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करता येत नाहीय. देशात कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लोकांना घरीच थांबावं लागत आहे. अशा कठीण काळातही क्रिकेट खेळत असताना रोहित शर्मा स्वत: ला भाग्यवान मानतो. रोहित शर्मा म्हणाला, "लोक कठीण काळातून जात आहेत. बऱ्याच लोकांचा रोजगार गेला आहे. लोकांना त्यांचे आवडते काम करता येत नाही. कमीतकमी आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करीत आहोत. ''
रोहित शर्मा क्रिकेट खेळाया मिळत असल्याने खूप आनंदी झाला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणाला की, माझा आवडता खेळ खेळायला मिळत असल्याने मी खूप खुश आहे. आपल्याला ताळमेळ बसवावा लागेल. आपण आपले सर्वोत्तम कसे देऊ शकता यासाठी प्रयत्न करा. आपल्याला बायो बबलचे हे जीवन देखील माहित आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना बायो बबल (जैव सुरक्षित) वातावरणामध्ये राहावे लागेल. यामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई चालणार नाही, अशा परिस्थितीत खेळाडूंचा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बाहेरील जगाशी संपर्क राहणार नाही.
मुंबई इंडियन्सने पाच वेळा जेतेपद जिंकलंय
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा आयपीएल कप जिंकला आहे. यंदा सलग तिसरे विजेतेपद मुंबई इंडियन्सला मिळवून देण्यासाठी रोहित शर्मा प्रयत्न करणार आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाही मुंबई इंडियन्सच्या संघात कोणताही मोठा बदल होणार नाही. रोहित शर्माला मात्र पहिल्या सामन्यात डी कॉकऐवजी ख्रिस लिनबरोबर डावाची सुरुवात करावी लागेल.