(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PBKS Vs RR: किंग्जसमोर रॉयल्सचं आव्हान; पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामना कधी, कुठे पाहणार?
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 52 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांशी भिडणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 52 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांशी भिडणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पंजाबच्या संघाचं नेतृत्व मयांक अग्रवाल करत आहे. तर, संजू सॅमसन राजस्थानच्या संघाची जबाबदारी संभाळत आहे. या सामन्यातून दोन युवा कर्णधार आमने सामने येणार आहेत.
पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हेड टू हेड रेकॉर्ड
पंजाब किंग्ज आणि राजस्थानचा संघ आतापर्यंत 23 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी राजस्थानच्या संघानं 13 सामने जिंकले आहेत. तर,स 10 सामन्यात पंजाबला विजय मिळवता आला आहे. पंजाबच्या संघानं राजस्थानसमोर सर्वाधिक 223 धावा केल्या आहेत. तर, राजस्थानच्या संघानं पंजाबसमोर 226 धावा केल्या आहेत. याशिवाय राजस्थानच्या गोलंदाजासमोर पंजाबचा संघ 124 ढेपाळला आहे. तर, राजस्थानचा संघ पंजाबसमोर 112 धावांवर आटोपला आहे.
कधी, कुठे आहे सामना?
आज 16 एप्रिल रोजी होणारा हा पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
संभाव्य संघ-
पंजाब किंग्स: मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह.
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल/यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, करुण नायर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट , प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.
हे देखील वाचा-