IPL 2020 : राजस्थान विरोधातील सामन्यापूर्वीच हैदराबादला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार खेळाडू संघाबाहेर
IPL 2020 : आज आयपीएलच्या मैदानात राजस्थान विरूद्ध हैदराबादचा सामना रंगणार आहे. परंतु, सामन्यापूर्वीच हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना रंगणार आहे. परंतु, आधीपासूनच संकटांचा सामना करत असलेल्या हैदराबादच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार फलंदाज केन विल्यमसन राजस्थान रॉयल्सच्या विरोधातील सामना खेळणार नाही.
केन विल्यमसनला दुखापत झाली आहे. अद्याप त्याला झालेल्या दुखापती संदर्भात जास्त माहिती मिळालेली नाही. रिपोर्ट्सनुसार, केन विल्यमसनला झालेली दुखापत जास्त गंभीर नाही. पण संघ आपल्या स्टार खेळाडूसोबत कोणताही धोका पत्करणार नाही.
केन विल्यमसनला कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधातील सामन्यात दुखापत झाली होती. सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला केकेआरच्या विरोधातील सामन्यांत ओपनिंग करण्यासाठी पाठवलं होतं. सामन्यानंतर वॉर्नरने सांगितलं होतं की, केन विल्यमसनला दुखापती झाली असून त्याला धावताना त्रास होत होता.
मोहम्मद नबीला मिळणार संधी
केन विल्यमसनला या टूर्नामेंटमध्ये सुरुवातीचे सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. विल्यमसनला संघात स्थान न दिल्यामुळे डेविड वॉर्नरवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर वॉर्नरने स्पष्ट केलं होतं की, केन विल्यमसन आयपीएलच्या सुरुवातीपासूनच तो दुखापतीने त्रस्त आहे.
केन विल्यमसनच्या जागी सनरायझर्स हैदराबादमध्ये मोहम्मद नबीची वापसी होऊ शकते. मोहम्मद नबीने केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी केली होती. परंतु, त्यानंतर त्याला बाहेर बसावं लागलं होतं. दरम्यान, प्ले ऑफ रेसमध्ये टिकून राहण्यासाठी सनरायझर्स हैदराबादसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हैदराबादचा संघ राजस्थानचा पराभव करण्यात यशस्वी झाला नाही तर प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याची त्यांची शक्यता अत्यंत कमी असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का! दुखापतीमुळे ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून माघार
IPL 2020: दिल्लीवर विजय मिळवत Points Tableमध्ये पंजाबची बढती, Delhi Capitals टॉपवर तर चेन्नई तळाला