IPL 2020 : बुम... बुम... बुमराह! दिल्लीवर जसप्रीत बुमराह भारी; रबाडाला मागे टाकत पर्पल कॅपवर कब्जा
IPL 2020, MI vs DC : दिल्ली विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने केवळ 14 धावा देत चार विकेट्स घेतले. त्यामुळे पर्पल कॅपच्या शर्यतीत पुन्हा मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे.
IPL 2020 : सलग चार वेळा आपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करत सहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. सध्याच्या चॅम्पियन मुंबईने टॉस हरल्यानंतरही पहिल्यांदा फलंदाजी करत पाच विकेट्स गमावत 200 धावांचा डोंगर दिल्लीसमोर उभा केला होता. मुंबईने दिलेलं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाने मात्र आठ विकेट्स गमावत केवळ 143 धावा केल्या. मुंबई याआधी 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये फायनल्समध्ये पोहोचली होती. कालच्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला असला तरी, दिल्लीचा आयपीएल 2020 मधील प्रवास अद्याप संपलेला नाही. आज होणाऱ्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये जिंकणाऱ्या संघासोबत दिल्लीचा सामना होणार असून या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाचा सामना आयपीएल 2020 च्या फायनलमध्ये मुंबईसोबत होणार आहे.
A match-winning performance! ???????? Bumrah registers his best figures in the IPL ???????????? #MIvDC #Dream11IPL pic.twitter.com/b4UXxNEAet
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
पर्पल कॅपवर बुमराहचा कब्जा
दिल्लीच्या विरोधात जसप्रीत बुमराह (14 धावा देत चार विकेट) आणि ट्रेंट बोल्ट (दो ओव्हर्समध्ये नऊ धावा देत दोन विकेट्स) यांनी धमाकेदार खेळी केली. पर्पल कॅपच्या शर्यतीत पुन्हा मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. बुमराहने 14 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतले आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आहे, ज्याच्या नावावर 25 विकेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आहे. त्याने 20 विकेट्स घेतले आहेत. तर पाचव्या क्रमांकावर आरसीबीचा स्पिनर युजवेंद्र चहल आहे, ज्याने आतापर्यंत 20 विकेट्स घेतले आहेत.
Purple Cap ✅ Double-wicket maiden ✅ Most wickets by an Indian pacer in a single @IPL season ✅
???? Jassi jaisa koi nahi ????#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvDC @Jaspritbumrah93 pic.twitter.com/SzFHTxNpkV — Mumbai Indians (@mipaltan) November 5, 2020
ईशान किशनची धमाकेदार खेळी
दिल्ली कॅपिटल्स विरोधात 55 धावांची खेळी करणाऱ्या मुंबईच्या ईशान किशनने या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ईशान किशन चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकं फटकावत आतापर्यंत 483 धावा केल्या आहेत. आयपीएल 2020 मध्ये 670 धावा केलेल्या केएल राहुलने ऑरेंज कॅपचा मान आपल्याकडेच ठेवला आहेत. दरम्यान, केएल राहुलचा संघ किंग्स इलेव्हन पंजाब प्लेऑफमध्ये पोहचू शकला नाही.
55* from just 30 balls ????
A ???? finish from Kishan ???? Live Updates: https://t.co/l3TXUHDSZ6 Ball-by-ball: https://t.co/7oZx1qY07m#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvDC @ishankishan51 pic.twitter.com/uD03az6WYu — Mumbai Indians (@mipaltan) November 5, 2020
दुसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. ज्याने 539 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज शिखर धवन आहे. ज्याने 525 धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा फलंदाज क्विंटन डी कॉक आहे, ज्याने 483 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :