MI vs KKR, IPL 2022: मुंबई-कोलकाता यांच्यात आज मोठी लढत, रायडर्ससमोर इंडियन्सचं मोठं आव्हान; कधी, कुठे पाहणार सामना?
IPL 2022: आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, मुंबईचा संघ तळाशी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे.
![MI vs KKR, IPL 2022: मुंबई-कोलकाता यांच्यात आज मोठी लढत, रायडर्ससमोर इंडियन्सचं मोठं आव्हान; कधी, कुठे पाहणार सामना? Indian Premier League 2022 MI vs KKR Live Streaming, Mumbai Indians vs Kolkata Knight Riders MI vs KKR, IPL 2022: मुंबई-कोलकाता यांच्यात आज मोठी लढत, रायडर्ससमोर इंडियन्सचं मोठं आव्हान; कधी, कुठे पाहणार सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/8fa2a34f2b930cdf05d2899f1632c485_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022: लखनौ सुपर जायंट्सकडून मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर कोलकात्याचा संघ आज मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) भिडणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, मुंबईचा संघ तळाशी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. दरम्यान, प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याचा संघ आज मुंबईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 11 सामन्यांत केवळ चार विजयांची नोंद करणाऱ्या कोलकात्याला उर्वरित तीन सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडं मुंबईचा संघ केवळ सन्मान वाचवण्यासाठी या स्पर्धेत खेळत आहे.
कधी,कुठे पाहणार सामना?
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज नऊ मे रोजी आयपीएल 2022 मधील 56 वा सामना खेळला जाणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातासापूर्वी नाणेफेक होईल. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येणार आहे. याशिवाय, मोबाईल ऍप डिस्ने हॉटस्टारही पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त सामन्यातील प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही एबीपी माझ्याशी कनेक्ट राहा
मुंबईचा संभाव्य इलेव्हन:
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय/बेसिल थम्पी, जसप्रीत बुमराह, आर. मेरेडिथ.
कोलकात्याचा संभाव्य इलेव्हन:
आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन/बाबा इंद्रजित (विकेटकीपर), आंद्रे रसल, अमन खान/अनुकुल रॉय, सुनील नरायण, टीम साऊथी, उमेश यादव/हर्षित राणा, शिवमहर्षी.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)