IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेतून धवनला का वगळलं? कारण आलं समोर
IND vs SA: आयपीएलच्या पंधराव्या हंगामानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.
![IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेतून धवनला का वगळलं? कारण आलं समोर IND vs SA: ‘Rahul Dravid took the tough call of excluding Shikhar Dhawan for India vs South Africa T20Is’: BCCI official IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेतून धवनला का वगळलं? कारण आलं समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/d5084978a494651664cbf4489bbdfafd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs SA: आयपीएलच्या पंधराव्या हंगामानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. येत्या 9 जूनपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा-विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर केएल राहुलला या संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. मात्र, भारताचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) जागा मिळाली नाही. यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. परंतु, शिखर धवनची संघात निवड का झाली नाही? याचं कारण भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविडनं सांगितलं आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शिखर धवननं चमकदार कामगिरी करून दाखवली. परंतु तरीही त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. यावर बहुतेक दिग्गज आणि चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं याप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. संघाची घोषणा होण्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्वतः धवनला फोन करून त्याची निवड का होत नाही? हे सांगितलं.
राहुल द्रविड शिखर धवनला काय म्हणला?
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं इनसाइडस्पोर्टने हा अहवाल दिला आहे. या अधिकाऱ्यानं सांगितले की, "शिखर धवननं भारतीय संघाला गेल्या दहा वर्षात भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. परंतु, बीसीसीआय टी-20 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी देऊ इच्छितो. राहुलला हा अवघड निर्णय घ्यावा लागला आणि सर्वांनी त्याच्याशी सहमती दर्शवली. संघाची घोषणा होण्यापूर्वी खुद्द राहुलनं शिखरला फोन करून ही माहिती दिली."
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.
हे देखील वाचा-
- IND vs SA: सेलिब्रेशन तो बनता है! उमरानच्या सिलेक्शननंतर इरफान पठाणनं कापला केक, काय आहे दोघांचं नातं?
- Womens T20 Challenge 2022: पूजा वस्त्राकरची चमकदार कामगिरी! सुपरनोव्हासचा ट्रेलब्लेझर्सवर 49 धावांनी विजय
- IPL 2022 Final : कोणते दोन संघ खेळणार अंतिम सामना? इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)