RR vs LSG, Pitch Report : राजस्थान विरुद्ध लखनौ रंगणार सामना, 'या' 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर पार पडणार आहे.
RR vs LSG, Pitch Report : आयपीएलमध्ये आज दोन सामने पार पडणार असून दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपरजायंट्स (RR vs LSG) या संघामध्ये पार पडणार आहे. मुंबईच्या प्रसिद्ध अशा वानखेडे मैदानात हा सामना पार पडणार आहे. दोन्ही संघ यंदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. कारण लखनौने चार पैकी तीन सामने जिंकले असून राजस्थानने देखील तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघेही यंदा दमदार फॉर्ममध्ये असल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना पार पडणाऱ्या वानखेडे मैदानात सायंकाळी दुसऱ्या संघाच्या गोलंदाजीवेळी दव अधिक पडत असल्याने प्रथम गोलंदाजी करणं पसंत करतात. प्रथम गोलंदाजी करुन संघाला कमी धावात रोखून समोरील लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करण्याची रणनीती नाणेफेक जिंकणाऱ्या संघाची असते. राजस्थानने आजवर वानखेडेच्या मैदानात खेळलेल्या 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला असून लखनौने खेळलेल्या एकमेव सामन्यात ते पराभूत झाले आहेत.
राजस्थान विरुद्ध लखनौ अशी असेल ड्रीम 11 (RR vs LSG Best Dream 11)
विकेटकीपर- जोस बटलर, संजू सॅमसन, क्विंटन डी कॉक
फलंदाज- यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल
ऑलराउंडर- शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉइनिसला
गोलंदाज- ट्रेंट बोल्ट, रवी बिश्नोई, आवेश खान.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- KKR vs DC, Match Live Updates : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर
- RCB Vs MI: मुंबईचा सलग चौथा पराभव, बंगळुरूनं 7 विकेट्स राखून सामना जिंकला
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha