(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB vs CSK, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध चेन्नई सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स या दोन संघात पुण्याच्या एमसीए मैदानात सामना रंगणार आहे.
RCB vs CSK, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्स (RCB vs CSK) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून बंगळुरु संघासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. त्यांची पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता अधिक चेन्नईच्या तुलनेत अधिक असल्याने आजच्या सामन्यातील विजय त्यांना अत्यंत महत्त्वाचा आहे. बंगळुरुने आतापर्यंत 5 सामने जिंकल्याने ते आणखी काही सामने जिंकून पुढील फेरीच पोहचू शकतात. दुसरीकडे चेन्नईने मात्र 6 सामने गमावल्याने त्यांना उर्वरीत सर्व सामने चांगल्या रनरेटने जिंकूणं अनिवार्य आहे.
आजवरच्या इतिहासाचा विचार आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (CSK vs RCB) हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता चेन्नईचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 9 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
बंगळुरु विरुद्ध चेन्नई अशी असेल ड्रीम 11 (RCB vs CSK Best Dream 11)
विकेटकीपर- दिनेश कार्तिक
फलंदाज- विराट कोहली, फाफ डु प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा,
ऑलराउंडर- शिवम दुबे, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा
गोलंदाज- हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मुकेश चौधरी
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना पुण्यातील एमसीए मैदानावर (MCA Ground, Pune) आतापर्यंतच्या काही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघही विजयी झाला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना दवाची अडचण अधिक येत नसल्याने गोलंदाजी चोख पडते. यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेण्याची अधिक शक्यता आहे.
हे देखील वाचा-
- Virat Kohli New Look: क्रिकेटर आहे की हॉलिवूडचा अभिनेता? विराट कोहलीच्या नव्या लूकवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया
- RCB Vs CSK Probable XI: बंगळुरूला पुन्हा हरवण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
- IPL Purple Cap 2022: पर्पल कॅपची स्पर्धा रोमांचक स्थितीत, 'या' पाच गोलंदाजांचं एकमेकांना मोठं आव्हान