LSG vs GT, Pitch Report : टेबल टॉपर्समध्ये आजची लढत, लखनौ विरुद्ध गुजरातमध्ये कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये(IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्ससमोर गुजरात टायटन्स संघाचं आव्हान असेल, दोन्ही संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे.
LSG vs GT, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात जायंट्स (LSG vs GT) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. दोन्ही संघानी आतापर्यंत दमदार कामगिरी केली असल्याने त्यांचं गुणतालिकेतील स्थानही दमदार आहे. आतापर्यंतच्या हंगामात लखनौच्या संघानं 11 सामन्यांपैकी 8 विजय मिळवले आहेत. तर, गुजरातनं 11 सामन्यापैकी 8 सामने जिंकले असून त्यांनी तीन सामन्यांत पराभव स्वीकारला आहे.
गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लखनौचा रनरेट अधिक असल्याने ते पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ जवळपास पुढील फेरीत पोहोचलेच आहेत, पण अधिकृत हे जाहीर होण्याआधी आज दोघांचा एकमेंकाशी सामना असल्याने आज त्यांच्यातील लढत चुरशीची होणार यात शंका नाही. आज होणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्सया सामन्यात दोन्ही संघाकडून एक दमदार खेळी पाहायला मिळू शकते. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...
लखनौ विरुद्ध गुजरात अशी असेल ड्रीम 11 (LSG vs GT Best Dream 11)
विकेटकीपर- केएल राहुल, क्विंटन डी कॉक
फलंदाज- शुभमन गिल, डेव्हिड मिलर, दीपक हुडा
ऑलराउंडर-राहुल तेवतिया, कृणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस
गोलंदाज- लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानात इतर मैदानांच्या तुलनेत कमी सामने झाल्याने तेथील खेळपट्टी अधिक चांगली आहे. त्यात सामना सायंकाळी असला तरी पुण्यातील तापमान पाहता दवाची अधिक अडचण दोन्ही इनिंगमध्ये येत नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी देखील करु शकतो. पण यंदाच्या हंगामात बहुतांश संघानी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना विजय मिळवला आहे. त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ नेमका कोणता निर्णय घेईल हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-