RR Vs MI: मुंबईसाठी डोकेदुखी ठरलाय राजस्थानचा 'हा' फलंदाज, पलटणविरुद्ध 6 डावात ठोकल्यात 400 धावा
RR Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 44 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (Rajasthan Royals vs Mumbai Indians) एकमेकांशी भिडणार आहे.
RR Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 44 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (Rajasthan Royals vs Mumbai Indians) एकमेकांशी भिडणार आहे. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) हा सामना रंगणार आहे. महत्वाचं म्हणजे, आयपीएलचा यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खराब ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला सलग आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईचा संघ अजून पहिल्या विजयाच्या शोधात आहे. तसेच राजस्थानविरुद्ध आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवणार, असं वाटत असताना पलटणच्या चाहत्यांना चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय.
मुंबईसमोर मोठी चिंता
राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर यंदाच्या हंगामात वेगळ्याच अंदाजात खेळताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात त्यानं तीन शतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबई आणि राजस्थान यांच्यात आज सामना रंगणार आहे. या सामन्यात जोस बटलर मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतो. जोस बटलरनं मुंबईविरुद्ध गेल्या सहा डावात 400 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आजच्या सामन्यात जोस बटलरविरोधात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा कोणती रणनिती आखतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
ट्वीट-
जॉस बटलर आक्रमक मोडमध्ये
यंदाच्या हंगामात जोस बटलरनं आठ सामने खेळले असून 71.29 च्या सरासरीनं 499 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. या कामगिरीसह त्यानं ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. या यादीत लखनौचा कर्णधार केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर तर, शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राजस्थानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर
यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. तर, संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानच्या संघानं चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, यंदाच्या हंगामात एकही सामना जिंकता न आलेल्या मुंबईच्या संघ गुणतालिकेच्या तळाशी म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा-