एक्स्प्लोर

अहमदाबाद झाकी है, मुंबई अभी बाकी है... वानखेडेवर हार्दिक पांड्याची गय नाही, रोहित आर्मीकडून ट्रोलिंगचा धोका

Hardik pandya vs Rohit Sharma : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला  (Mumbai Indians)  यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

Hardik pandya vs Rohit Sharma : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला  (Mumbai Indians)  यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium in Ahmedabad) गुजरातने मुंबईचा सहा धावांनी पराभव केला. पण या सामन्यावेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यानं हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सामन्यादरम्यान आणि सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले. हार्दिक पांड्या नाणेफेकीला आला, त्यावेळी सर्वांनीच चाहत्यांनी मुंबईचा राजा रोहित शर्मा.. आशी घोषणाबाजी केली. त्याशिवाय सामना झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला पाहून छपरी छपरी आशा घोषणा दिल्या. हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण हार्दिक पांड्याला मुंबईत यापेक्षा जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो. मुंबईमध्ये रोहित शर्माचे चाहते मोठ्या प्रमाणात आहे. त्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल केले जाऊ शकते. त्यामुळे अहमदाबाद झाकी है, मुंबई अभी बाकी है... असं म्हटल्यास वावगं वाटायला नको. 

हार्दिक पांड्यावर गुजरात आणि मुंबई संघाचे चाहते नाराज आहेत. कारण, हार्दिक पांड्याने गुजरातचं नेतृत्व केले, त्यावेळी संघाला दोन वेळा अंतिम फेरीत नेलं होतं. 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चषकावर नाव कोरले होते. 2023 मध्ये गुजरात संघ उपविजेता होता. पण 2024 आयपीएलआधी हार्दिक पांड्याने गुजरातची साथ सोडली अन् मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवलं, अन् संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली. त्यामुळे रोहित शर्माचे चाहते मोठ्या प्रमाणात नाराज झाले. चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. कारण, रोहित शर्माने मुंबईला पाचवेळा आयपीएल चषक जिंकून दिलाय. रोहित शर्मा आयपीएलमधील यशस्वी कर्णधारापैकी एक आहे, असे असतानाही मुंबईने त्याला कर्णधारपदावरुन काढलं. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप होता. 

वानखेडेवर हार्दिक पांड्याचं काय होणार ?

हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद दिल्यामुळे चाहते नाराज आहेत. सोशल मीडियासोबतच स्टेडियमवरही ते आपला राग व्यक्त करत आहेत. हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यामुळे आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यावेळी हार्दिक पांड्याला ट्रोल केले जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचे चाहते हार्दिक पांड्याची गय करणार नाहीत. एक एप्रिल 2024 रोजी मुंबई इंडियन्स वानखेडेवर राजस्थानविरोधात खेळत आहे. घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या पहिल्यांदाच उतरणार आहे. त्यावेळी चाहते त्याला हुटिंग करण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता मुंबईत काय होणार? याकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक, कधी अन् कुणासोबत होणार सामने ?

24-मार्च-2024 रविवार - 7:30PM गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स Ahmedabad
27-मार्च-2024 बुधवार - 7:30PM सनरायजर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स Hyderabad
01-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स Mumbai
07-एप्रिल-2024 रविवार - 3:30PM मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स Mumbai
11-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs आरसीबी Mumbai
14-एप्रिल-2024 रविवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स Mumbai
18-एप्रिल-2024 गुरुवार - 7:30PM पंजाब किंग्स vs मुंबई इंडियन्स Mullanpur
22-एप्रिल-2024 सोमवार - 7:30PM राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स Jaipur
27-एप्रिल-2024 शनिवार - 3:30PM दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स Delhi
30-एप्रिल-2024 मंगळवार - 7:30PM लखनौ सुपर जायंट्स vs मुंबई इंडियन्स Lucknow
03-मे-2024 शुक्रवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स Mumbai
06-मे-2024 सोमवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs सनरायजर्स हैदराबाद Mumbai
11-मे-2024 शनिवार - 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स Kolkata
17-मे-2024 शुक्रवार - 7:30PM मुंबई इंडियन्स vs लखनौ सुपर जायंट्स Mumbai

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget