ट्रोलिंग, अपमान, डिवचलं....; मुंबईच्या सलग 3 पराभवानंतर हार्दिकने अखेर मौन सोडलं, काय म्हणाला?
Mumbai Indians Hardik Pandya: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नाही.
Mumbai Indians Hardik Pandya Marathi News: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सलग तिसरा पराभव झाला. 1 मार्चला झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबईचा 6 गडी राखून पराभव केला. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नाही.
राजस्थानविरुद्ध फलंदाजी करताना हार्दिक पांड्या चांगला खेळत होता, मात्र त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. याचदरम्यान मुंबई इंडियन्सच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये 'या संघाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, ती म्हणजे आम्ही कधीही हार मानणार नाही. आम्ही लढत राहू, पुढे जात राहू', असं हार्दिकने म्हटलं आहे. हार्दिक पांड्याच्या या पोस्टीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
If there's one thing you should know about this team, we never give up. We'll keep fighting, we'll keep going. pic.twitter.com/ClcPnkP0wZ
— hardik pandya (@hardikpandya7) April 2, 2024
ट्रोलिंग, अपमान, हूटिंग....
पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईची स्थिती सध्या ठीक नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या ताफ्यातील वातावरणही ठीक नसल्याचे दिसत आहे. हार्दिक पांड्या एकटा पडल्याचे अनेक प्रसंगावरुन दिसत आहे. चाहत्यांकडून त्याला हूटिंग केले जात आहे. हार्दिक पांड्याला जोरदार हूटिंग केलं जात आहे. मात्र यानंतरही हार्दिक शांत अन् संयमाने मुंबईच्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
मुंबईचा राजा रोहित शर्मा...
हार्दिक पांड्याकडे मुंबईची धुरा सोपवल्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. त्यांच्या रोषाचा सामना हार्दिक पांड्याला करावा लागतोय. प्रत्येक सामन्यावेळी हार्दिक पांड्याला हूटिंग केले जाते. वानखेडे मैदानावरही हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्यासमोर रोहित रोहित, मुंबईचा राजा रोहित शर्मा... अशी घोषणाबाजी केली जाते.
रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम-
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आतापर्यंत रोहित शर्माशिवाय, दिनेश कार्तिक आयपीएलच्या इतिहासात 17 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. आतापर्यंत ग्लेन मॅक्सवेल 15 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे.