Hardik Pandya : 'तुझ्यासोबत खेळणं, माझ्या करीअरमधील सर्वात बेस्ट अनुभव,' पोलार्डच्या निवृत्तीनंतर पांड्या भावूक
IPL 2023 : मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमियर लीग मागील कित्येक वर्षे गाजवल्यावर अखेर यंदाच्या आयपीएलपूर्वी पोलार्डने निवृत्ती जाहीर केली आहे
Pollard retired from IPL : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील एक सर्वाच मोठा मॅचविनर खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard). मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून इंडियन प्रीमियर लीग मागील कित्येक वर्षे गाजवल्यावर अखेर यंदाच्या आयपीएलपूर्वी पोलार्डने निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने पोलार्डला रिलीज केलं ज्यानंतर पोलार्डनं निवृत्ती घेतली. दरम्यान पोलार्डच्या निवृत्तीनंतर त्याचा जवळचा मित्र आणि आयपीएलमध्ये बराच काळ त्याच्यासोबत खेळलेला भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यानेही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
पोलार्डच्या निवृत्तीनंतर पांड्याने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की, 'माय पॉली, मला तुझ्यापेक्षा चांगला मार्गदर्शक आणि मित्र मिळू शकला नसता. तुझ्यासोबत मैदानावर खेळणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात भारी अनुभव होता. तुझ्यासोबत खेळताना कधीच कंटाळा आली नाही. तुझ्या नवीन भूमिकेसाठी मी तुला शुभेच्छा देतो.'
View this post on Instagram
पोलार्डकडे नवी जबाबदारी
निवृत्तीनंतरही पोलार्ड मुंबई इंडियन्स संघासोबतच (Mumbai Indians) राहणार असून तो मुंबईच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोलार्डने निवृत्ती घेताना शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या स्टार खेळाडूला आता कोचिंग देताना पाहणं मुंबई संघासह चाहत्यांसाठी एक खास अनुभव असणार आहे.
हे देखील वाचा-