एक्स्प्लोर

IPL 2022 Playoffs : 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित; मुंबई, चेन्नईपासून सर्व संघाची काय आहे स्थिती?

IPL Playoffs Update : सध्या गुणतालिकेत मुंबई आणि चेन्नई हे संघ सर्वात खालच्या स्थानावर आहेत. तरी देखील मुंबई संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणं अजूनही शक्य आहे.

IPL 2022 News : आयपीएलच्या लीग स्टेजमधील जवळपास निम्मे सामने संपले असून आता प्लेऑफमध्ये पोहोचणारे संघ कोणते? ही चुरस सुरु झाली आहे. लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने खेळले जाणार असून प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. पुढील फेरीत अर्थात प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान 16 गुणांची गरज संघाला असते. दरम्यान सध्याची संघाची स्थिती पाहता काही संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे मुंबई, चेन्नई संघाची स्थिती मात्र अवघड झाली आहे.

'या' दोन संघाचं प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित

सद्यस्थितीला हार्दिक पंड्या कर्णधार असणारा संघ गुजरात टायटन्स 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी 6 पैकी 5 सामने जिंकले असून केवळ एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्याच्या खात्यावर 10 गुण आहेत. दरम्यान आता त्यांना पुढील फेरीत पोहचण्यासाठी उर्वरीत 8 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकणे गरजेचे आहे. दुसरा संघ म्हणजे रॉयल चँलेजर्स बंगळुरु जो गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेही 10 गुण असून त्यांना उर्वरीत 7 सामन्यात किमान 4 सामने जिंकण गरजेचं आहे. त्यामुळे या दोघांचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित आहे.

'या' संघाचीही पुढील फेरीत पोहचण्याची शक्यता  

याशिवाय राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघाच्या खात्यातही प्रत्येकी 8 गुण आहेत. त्यामुळे त्यांचीही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यानावावरही प्रत्येकी 6-6 गुण आहेत. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नावावर 4 गुण असले तरी त्यांनी सर्वांपेक्षा कमी 5 सामनेच खेळले आहेत. दिल्लीचे अजून 9 सामने बाकी असल्याने त्यांचही प्लेऑफमध्ये पोहोचणं शक्य आहे.

मुंबई, चेन्नईचा मार्ग खडतर

यात मुंबई संघाचा (MI) संघाचा विचार करता त्यांनी सलग सहा सामने गमावल्यामुळे ते शून्य गुण आणि  -1.048 च्या रनरेटसह ते सर्वात शेवटच्या अर्थात दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांना स्पर्धेत राहण्यासाठी उर्वरीत आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकणं अनिवार्य आहे. हे सर्व सामने चांगल्या रनरेटने जिंकणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ असल्याने मुंबईला पुढील फेरीत स्थानासाठी उर्वरीत आठ पैकी आठ सामने चांगल्या रनरेटने जिंकण अनिवार्य आहे. कारण पुढील फेरीत एन्ट्रीसाठी 16 गुण गरजेचे असल्याने मुंबई आठ पैकी आठ सामने जिंकल्यासत 16 गुण मिळवू शकते. दरम्यान मुंबईला पुढील फेरीत जाण्यासाठी इतर संघाचा खेळही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. 

तसंच चेन्नई संघाने सहा पैकी पाच सामना त्यांनी गमावले असून आता त्यांचा सातवा सामना असणार आहे. त्यांचा नेटरनेटरेटही -0.638 असून 16 गुण मिळवून एका चांगल्या रनरेटसहच ते पुढील फेरीत पोहचू शकतात. चेन्नईला देखील उर्वरीत आठ पैकी किमान सहा सामने जिंकून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवता येईल. पण यंदा आठ जागी 10 संघ असल्याने पुढील फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरीत आठ पैकी सात सामने तेही तगड्या रनरेटने जिंकणं चेन्नईला अनिवार्य असणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha KesakarABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Embed widget