GT vs SRH, Top 10 Key Points : राशिदने सामना फिरवला, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
GT vs SRH, Top 10 Key Points : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. राशिद खान याने तुफानी फटकेबाजी करत सामना फिरवला.
![GT vs SRH, Top 10 Key Points : राशिदने सामना फिरवला, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर GT vs SRH IPL 2022 Gujarat Titans won by 5 wickets against Sunrisers Hyderabad Top 10 Key Points GT vs SRH, Top 10 Key Points : राशिदने सामना फिरवला, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/27/9debdafec5376b5ed48443ba3a5b4692_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
GT vs SRH, Top 10 Key Points : राहुल तेवातिया आणि राशिद खान यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने हैदराबादचा पाच गड्यांनी पराभव केला आहे. राहुल-राशिद यांच्या विस्फोटक खेळीच्या बळावर गुजरात संघाने हैदराबादने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. गुजरातने निर्धारित 20 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. राशिद खान याने तुफानी फटकेबाजी करत सामना फिरवला. या विजयासह गुजरातच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलेय. गुजरातने आठ सामन्यात सात विजय नोंदवले आहेत. आज झालेल्या रोमांचक सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...(GT vs SRH, Top 10 Key Points )
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गुजरातच्या संघात कोणताही बदल नाही. हैदराबादच्या संघात जगदिश सुचितच्या जागी वॉशिंगटन सुंदरला स्थान
गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. केन विल्यमसन आणि राहुल त्रिपाठीला लवकर तंबूत धाडले. शमीने दोघांना बाद केले.
युवा अभिषेक शर्मा (65) आणि मार्करम (56) यांच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने 195 पर्यंत मजल मारली.
राशिद लॉकि फर्गुसन ठरले सर्वात महागडे गोलंदाज. राशिदला चार षटकात 45 तर लॉकी फर्गुसनला चार षटकात 52 धावा निघाल्या. या दोन्ही गोलदाजाला एकही विकेट घेतला आली नाही.
196 धावांचा पाठलाग करताना गुजरातची दणक्यात सुरुवात.. साहा आणि गिल यांनी 69 धावांची सलामी दिली.
उमरान मलिकने भेदक मारा करत गुजरातच्या फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवला. उमरान मलिकने गुजरातचा अर्धा संघ बाद केला. उमरान मलिकने चार षटकात 25 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. मलिकने गुजरातचे आघाडीचे पाच फलंदाज बाद केले.
वृद्धीमान साहाने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. ठरावीक अंतराने गडी बाद होत असताना साहाने अर्धशतकी खेळी केली. साहाने 38 चेंडूत 68 धावांची खेळी केली.
राहुल तेवातिया आणि राशिद खान यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत सामना फिरवला. तेवातियाने 40 तर राशिद खान याने 31 धावांची खेळी केली. दोघांनी मोक्याच्या क्षणी 24 चेंडूत 59 धावांची खेळी केली.
गुजरातला विजयासाठी 12 चेंडूत 33 धावांची गरज होती. राहुल तेवातिया आणि राशिद खान यांनी तुफानी फटकेबाजी करत विजय मिळवला. 19 व्या षटकात त्यांनी 13 धावा चोपल्या. तर अखेरच्या षटकात सामना रंगतदार अवस्थेत पोहचला होता. अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना राशिद खान याने षटकार लगवात गुजरातला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)