GT vs RCB: बंगळुरूविरुद्ध सामन्यात हार्दिकसोबत घडली विचित्र घटना; पाहून पत्नी नताशाही झाली हैराण
GT vs RCB, IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. दरम्यान, गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात 67 सामना खेळला गेला.
GT vs RCB, IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. दरम्यान, गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात 67 सामना खेळला गेला. या सामन्यात हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून बंगळुरूसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र, गुजरातचा संघ या धावसंख्येचा बचाव करू शकला नाही आणि त्यांना बंगळुरूकडून आठ विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. गुजरातकडून कर्णधार पांड्यानं सर्वाधिक 63 धावा केल्या. ज्यात चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. परंतु, या सामन्यात हार्दिक पांड्यासोबत एक विचित्र घटना पाहायला मिळाली, ज्याला पाहून त्याची पत्नी नताशा स्तांकोविकनेही (Natasa Stankovic) एक अप्रतिम प्रतिक्रिया दिली, जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
गुजरातच्या डावातील 10 षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळी त्याच्या हातातून बॅट सुटली आणि थेट स्क्वेअर लेग अंपायरकडं जाऊन पडली. हे पाहून स्टँडमध्ये बसलेली हार्दिकची पत्नी नताशा स्तांकोविक आश्चर्यचकित झाली. नताशाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तिनं पुन्हा हातवारे करून विचारले की काय झाले? नताशाची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बंगळुरूविरुद्धसामन्यात गुजरातचा आठ विकेट्सनं पराभव
दरम्यान, बंगळुरूविरुद्ध पराभवानंतरही गुजरातला फारसा फरक पडला नाही. कारण या संघानं प्रथमच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केलं आहे. लीग स्टेजमध्ये गुजरातच्या संघानं त्यांचे संपूर्ण 14 सामने खेळले आहेत. यातील 10 सामन्यात त्यांनी विजय नोंदवला आहे. तर, फक्त चार सामने गमावले आहेत. 20 गुणांसह गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहे.
व्हिडिओ-
हे देखील वाचा-