GT vs RCB, IPL 2022: गुजरातच्या पराभवामुळं हार्दिक पांड्या भडकला, सांगितलं सामना गमावल्यामागचं मोठं कारण
GT vs RCB, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या गुजरातच्या संघाला त्यांच्या अखेरच्या सामन्यात बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला.
GT vs RCB, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या गुजरातच्या संघाला त्यांच्या अखेरच्या सामन्यात बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ 20 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान, गुजरातला पराभूत करून बंगळुरूच्या संघानं प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या संघावर चांगलाच भडकला. तसेच गुजरातच्या संघानं सामना कुठे आणि कसा गमावला, हे त्यानं सांगितलं आहे.
हार्दिक पंड्या सामन्यानंतर आपल्या संघाच्या पराभवाबद्दल म्हणाला, 'आम्ही मोठी धावसंख्या बनवू शकलो नाही. आम्ही विचार करत होतो की आम्ही धीम्या गतीनं गोलंदाजी करू, वेगात बदल केला तर चांगले होईल, पण आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. आम्ही एकापाठोपाठ एक विकेट गमावत होतो, पुढच्या सामन्यांमध्ये तेच करायचे नाही. जेव्हा आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचतो तेव्हा आम्हाला लवकर विकेट गमावायची नाहीत. हा सामना आमच्यासाठी धडा ठरला आहे आणि त्याकडे त्या दृष्टीनं पाहू. ऋद्धिमान साहाला किरकोळ दुखापत झाल्यानं त्याला विश्रांती देण्यात आली होती.
या सामन्यात हार्दिक पांड्यानं गुजरातकडून सर्वाधिक 47 चेंडूत 62 धावा केल्या. विशेष म्हणजे, गुजरातला पराभूत करून बंगळुरूच्या संघाचे 16 अंक झाले आहेत. तर, सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. दोन्ही संघांचे प्रत्येकी 12-12 गुण आहेत. दोघांनाही त्यांचा एक-एक सामना खेळायचा आहे. चेन्नईसुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्ली पराभूत झाल्यात बंगळुरूचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.
हे देखील वाचा-