Akash Madhwal Fees : RCB कडून केवळ नेट प्रॅक्टिस, आता मुंबईचा स्ट्राईकर, आकाश मधवालला MI ने किती रुपयात केले होते खरेदी?
Akash Madhwal, MI vs LSG : आयपीएल 2023 च्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी खरा हिरो ठरलेल्या आकाश मधवालला मुंबईने काही लाख रुपयांना संघात सामील केलं. पण, या खेळाडूनं लाखमोलाची कामगिरी केलीय.
Akash Madhwal Record in IPL : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या 16 व्या मोसमात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 81 धावांनी पराभव करत नॉकआउट केलं. या विजयासह मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पोहोचला आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात आकाश मधवाल मुंबई इंडियन्सच्या विजयाचा खरा हिरो ठरला. आकाश मधवाल 5 धावांत 5 बळी घेतले. मधवाल या दमदार कामगिरीमुळे तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला.
काही लाखांत खरेदी केलेल्या खेळाडूची लाखमोलाची कामगिरी
आकाश मधवालनं यंदाच्या हंगामात आयपीएल 2023 मध्ये पदार्पण केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूने मुंबई इंडियन्सला क्वालिफायर सारखा महत्त्वाचा सामना जिंकून दिला. मुंबई इंडियन्ससाठी खरा हिरा ठरलेल्या या खेळाडूला संघाने फक्त काही लाख रुपयांना संघात सामील केलं. पण, या खेळाडूनं लाखमोलाची कामगिरी केली आहे.
आकाश मधवालनं जिंकून दिला क्वालिफायर सामना
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2023 (IPL 2023) एलिमिनेटर सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर्सचा 81 धावांनी पराभव केला. मुंबईच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला आकाश मधवाल. यात मधवालने केवळ 5 धावांत पाच बळी घेतले.
आकाश मधवालसाठी मुंबईने मोजले फक्त काही लाख
मुंबईच्या या 29 वर्षीय खेळाडूनं पदार्पणाच्या मोसमात संघासाठी फार महत्त्वाची कामगिरी केली आहे. आकाश मधवाल हे नाव आता प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या तोंडून ऐकू येत आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधवालने आपल्या संघासाठी जे काम केले ते करोडो रुपये मोजणारे खेळाडूही करू शकले नाहीत. मुंबई इंडियन्सच्या टीमने आकाश मधवालला 20 लाख रुपयांच्या किमतीला आपल्या टीममध्ये सामील केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एका मोसमात मधवालला मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि आज त्याने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला. सूर्यकुमार यादवच्या जागी 2022 मध्ये मधवालचा मुंबई संघात समावेश झाला असता. पण आयपीएल 2022 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
आरसीबी संघाचा भाग होता आकाश मधवाल
आकाश मधवाल हा उत्तराखंडच्या पांढऱ्या चेंडू संघाचा कर्णधार आहे. 2020 मध्ये मधवाल नेट बॉलर म्हणून आरसीबी संघाला भाग होता. 2021 मध्ये तो लिलावात अनसोल्ड राहिला. आरसीबी (RCB) च्या आकाशची प्रतिभा न ओळखल्याने मुंबई इंडियन्स संघाने 2022 मध्ये त्याला संघात सामील केलं. मधवाल यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहची जागा उत्तमरित्या सांभाळताना दिसत आहे.
आकाश मधवालनं संधीचं सोनं केलं
आकाश मधवालला मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2023 मध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीत यश न मिळाल्याने आकाश मधवालला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली. आकाश मधवालने संधीचं सोनं केलं. अवघ्या काही सामन्यांमध्ये आकाश या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे.