GT Vs CSK, IPL 2022 LIVE: गुजरातचा चेन्नईवर तीन विकेट्सनं विजय
GT vs CSK: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 29 व्या सामन्यात गुजरातचा टायटन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जशी (Gujarat Titans vs Chennai Super Kings) भिडणार आहे.

Background
GT vs CSK: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 29 व्या सामन्यात गुजरातचा टायटन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जशी (Gujarat Titans vs Chennai Super Kings) भिडणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) आज हा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात गुजरातच्या संघानं पाच पैकी चार सामने जिंकत आपली छाप सोडली आहे. तर, चेन्नईच्या संघानं पहिले चार सामने गमावल्यानंतर पाचव्या सामन्यात बंगळुरूला पराभूत करून पहिला विजय मिळवला आहे.
आजचा सामना पार पडणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानावर आतापर्यंत पाच पैकी तीन सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना दवाची अडचण अधिक येत नसल्याने गोलंदाजी चोख पडते. यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेऊ शकतो. चेन्नईने या ठिकाणी चांगली कामगिरी केली असून आठ पैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज:
रॉबिन उथप्पा, रुतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकिपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी, अॅडम मिल्ने, ड्वेन प्रिटोरियस, डेव्हॉन कॉनव्हे, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, हरी निशांत, एन जगदीसन, सुभ्रांशु सेनापती, प्रशांत सोलंकी, केएम आसिफ, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगरगेकर, भगत वर्मा.
गुजरात टायटन्स:
मॅथ्यू वेड (विकेटकिपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल, वृद्धिमान साहा, प्रदीप संगवान, वरुण आरोन, जयंत यादव, गुरकीरत सिंह मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नालकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, साई सुदर्शन, नूर अहमद.
हे देखील वाचा-
- Shane Watson on Mumbai Indians: ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन
- Deepak Chahar: आयपीएलमधून बाहेर पडलेल्या दीपक चहरला 14 कोटी मिळणार का? येथे मिळवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर
- IPL 2022: आयपीएल आणि गर्लफ्रेन्डमध्ये पठ्ठ्यानं कोणाला निवडलं? मैदानावरील पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा
गुजरातचा चेन्नईवर तीन विकेट्सनं विजय
पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 29 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 3 विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघानं चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला आहे.
GT Vs CSK: 87 धावांवर गुजरातचा अर्धा संघ माघारी
चेन्नईनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. 87 धावांवर गुजरातचा अर्धा संघ माघारी परतला आहे.




















