IPL 2022: आयपीएल आणि गर्लफ्रेन्डमध्ये पठ्ठ्यानं कोणाला निवडलं? मैदानावरील पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 25 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत झाली.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 25 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात हैदराबादच्या संघानं सात विकेट्स राखून हैदराबादवर विजय मिळवला आहे. या विजयात हैदराबादचा फलंदाज राहुल त्रिपाठीनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात एका चाहत्यानं झळकावलेल्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस क्रिकेटची क्रेझ वाढताना दिसत आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सचे खूप चाहते सामना पाहण्यासाठी आले होते. परंतु, एका चाहत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. संबंधित चाहत्यानं भरमैदानात झळकावलेल्या पोस्टरमध्ये लिहलं होतं की, माझ्या गर्लफ्रेन्डनं आयपीएल आणि तिच्यापैकी एका निवडायला सांगितलं आणि मी आयपीएल बघायला आलो. म्हणजे, आयपीएलसाठी त्यानं गर्लफ्रेन्डला सोडलं असं म्हणणं वावग ठरणार नाही. त्यानं झळकावलेलं पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
ट्वीट-
याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळरू यांच्यातील सामन्यात दरम्यान एका महिला प्रेक्षक चर्चेत आली होती. जो पर्यंत आरसीबीचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही, तो पर्यंत लग्नच करणार नाही, असं पोस्टर या तरूणीनं भरमैदानात झळकावलं होतं. त्यानंतर गुजरात आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात एका चाहत्यानं पोस्टरच्या माध्यमातून गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला चॅलेंज केलं होतं. आजच्या सामन्यात हार्दिकनं अर्धशतक झळकावल्यास नोकरी सोडेल, असं त्या व्यक्तीनं पोस्टरमध्ये लिहलं होतं. या सामन्यात हार्दिकनं 42 चेंडूत अर्धशतक केलं होतं.
हे देखील वाचा-
- MI vs PBKS, Toss Update : मुंबईने नाणेफेक जिंकली, सामना जिंकणार का? पहिली गोलंदाजी घेत महत्त्वाचा बदल; पाहा आजची अंतिम 11
- Who is Aman Hakim Khan: अपघातानंतरही क्रिकेट सोडलं नाही, आयपीएलमध्ये पदार्पण करणारा अमन हाकीम खान आहे तरी कोण?
- Rahul Tripathi: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर घोंगावलं राहुल त्रिपाठी नावाचं वादळ, कोलकात्याच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडत रचले अनेक विक्रम