Majha Maha Katta : माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्याकडून कोहलीचं कौतुक, गौतम गंभीरवर नेमकं काय म्हणाले माजी क्रिकेटपटू
Sandeep Patil on Kohli and Gambhir Fight : माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवर नेमकं काय म्हणाले आहेत, जाणून घ्या.
Majha Maha Katta Sandeep Patil on Kohli and Gambhir Fight : सध्या आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाम सुरु आहे. यंदाच्या हंगामातील चर्चेचा विषय म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद. या वादावर आता माजी क्रिकेटपटू (Former Indian Cricketer) संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझ्याच्या माझा महाकट्टा (Majha Mahakatta) या विशेष कार्यक्रमात मुलाखत देताना त्यांनी विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. माजी क्रिकेटपटू संदीप पाटील आणि गौतम गंभीर यांनी या प्रकरणावर नक्की काय म्हटलंय जाणून घ्या.
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या विशेष कार्यक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'माझा महाकट्टा' (ABP Majha Mahakatta) या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राजकीय नेते, पुढारी, कलाकार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी माजी क्रिकेटपटू (Former Indian Cricketer) संदीप पाटील (Sandeep Patil) आणि त्यांचा मुलगा अभिनेता चिराग (Chirag Patil) यांनी हजेरी लावली. या मुलाखतीत संदीप पाटील यांनी विराट कोहली आणि गौतम यांच्या (Virat Kohli and Gautam Gambhir Fight) वादावर आपलं मत मांडलं आहे.
संदीप पाटील यांच्याकडून कोहलीचं कौतुक
यावेळी संदीप पाटील यांनी विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. संदीप पाटील यांनी म्हटलं की, सध्याच्या आयपीएलमध्ये आपल्या कोहली आणि गंभीर एकमेकांसोबत भांडताना दिसत आहेत. पण विराट कोहलीने इथंपर्यंत पोहोचण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. विराट कोहली आणि इतर सर्व खेळाडू सध्या फिटनेसवर विशेष लक्ष देतात. कोहलीचं भरभरून कौतुक करताना त्यांनी म्हटलं की, विराट कोहली दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करतो.
संदीप पाटील यांनी कोहलीबाबतचा एक किस्सा सांगितला की, ''एकदा ते त्यांच्या पत्नीसोबत नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले. तेव्हा त्यांना मैदानात एक व्यक्ती काळोखात व्यायाम करताना दिसला. तो विराट होता. सकाळी पाच वाजता उठून विराट योगा करत होता, त्यानंतर एक तासानंतरही विराट तिथेच योगा करत होता. त्यानंतर तो जीममध्ये वर्खआऊट करण्यासाठी गेला आणि त्याच दिवशी सामन्यात त्याने 200 धावा केल्या. या खेळाडूंची मेहनत पाहून फार आनंद वाटतो.''
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL History : कोहली अन् गंभीर आधी 'हे' खेळाडूही भिडले होते, एकानं तर भरमैदानातच कानशिलात लगावली