(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये 'हे' वेगवान गोलंदाज करू शकतात पदार्पण, मेगा ऑक्शनमध्ये मिळाली इतकी रक्कम
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत.
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयपीएल पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूला चांगली रक्कम मिळाली आहे. यातील काही वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात.
बेनी हॉवेल
बेनी हॉवेल हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जच्या संघानं या परदेशी खेळाडूवर बोली लावली होती. हॉवेलला पंजाब संघानं 40 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. पंजाब संघासाठी तो खूप महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. यंदाच्या हंगामातून तो आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो.
रोमॅरियो शेफर्ड
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज रोमॅरियो शेफर्ड आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघानं त्याला सामील केलंय. त्याला हैदराबादनं 7.75 कोटी रुपयांना विकत घेतलं. यावेळी मेगा ऑक्शनमध्ये सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीतही त्याचा समावेश झालाय.
दुष्मंता चमीरा
आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरालाही भरपूर पैसे मिळालं होतं. चमीराला लखनौ सुपरजायंट्सच्या संघानं दोन कोटी रुपयांना विकत घेतलंय. त्यानं आपल्या शानदार गोलंदाजीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल छाप सोडली आहे. त्याचं आयपीएलमधील पदार्पण जवळपास निश्चित समजलं जात आहे.
ओबेद मॅकॉय
राजस्थान रॉयल्स संघाने मेगा ऑक्शनमध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयवर बोली लावली. राजस्थाननं त्याला 75 लाखांत विकत घेतलं होतं. तो एक उत्कृष्ट गोलंदाज असून राजस्थानच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.
डॉमिनिक ड्रेक्स
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज अष्टपैलू डॉमिनिक ड्रेक्सला गुजरात टायटन्सनं विकत घेतलं. गुजरातच्या संघानं त्याला 1.10 कोटीत विकत घेतलंय. यंदा तोही आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो.
हे देखील वाचा-
- KKR Team Preview : कोलकाता नाईट रायडर्स करणार आयपीएलचा शुभारंभ, कशी असेल यंदाच्या हंगामासाठी रणनीती?
- IPL 2022: आयपीएलची पाचवी ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात, आतापर्यंत सीएसकेची कामगिरी कशी? कोणत्या खेळाडूंवर राहणार नजर?
- IPL 2022: ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha