एक्स्प्लोर

IPL 2022: ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे.

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच काही संघासाठी वाईट बातमी समोर आलीय. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-20 सामना खेळायचा आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं आज पाकिस्तानविरुद्ध त्यांचा एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-20 सामन्यासाठी संघ जाहीर केलाय. ज्यात आयपीएल 2022 मध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकाचा कर्णधार आरोन फिंच, मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्श आणि शॉन अॅबॉट यांचाही समावेश आहे. हे सर्व खेळाडू 5 एप्रिलपर्यंत पाकिस्तानमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. त्यानंतरच आयपीएल खेळण्यासाठी भारतात दाखल होणार आहे. 

आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये आरोन फिंच अनसोल्ड ठरला होता. मात्र, त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सच्या संघानं विकत घेतलं. तर, मिशेल मार्शला दिल्ली कॅपिटल्सनं 6.50 कोटी रुपयांना आणि मार्कस स्टोइनिसला लखनौनं 9.20 कोटी रुपयांना लिलावापूर्वी ड्राफ्ट केलं होतं. याशिवाय, शॉन अॅबॉटला सनरायझर्स हैदराबादनं 2.40 कोटींना विकत घेतलं आहे. 

आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये विकत घेतलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू

1) डेव्हिड वॉर्नर- दिल्ली कॅपिटल्स (6.25 कोटी)

2) मिचेल मार्श- दिल्ली कॅपिटल्स (6.50 कोटी) 

3) जोश हेजलवुड-  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (7.75 कोटी)

4) डॅनियल सॅम्स- मुंबई इंडियन्स (2.60 कोटी)

5) जेसन बेहरेनडॉर्फ- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (75 लाख)

6) पॅट कमिन्स-  कोलकाता नाइट रायडर्स (7.25 कोटी)

7) शॉन अॅबॉट- सनरायझर्स हैदराबाद (2.40 कोटी)

8) रिले मेरेडिथ- मुंबई इंडियन्स (1 कोटी)

9) नॅथन एलिस- पंजाब किंग्स (75 लाख)

10) नॅथन कुल्टर-नाईल- राजस्थान रॉयल्स (2 कोटी)

11) मॅथ्यू वेड- गुजरात टायटन्स (2.40 कोटी)

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 : ABP MajhaFatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
Embed widget