DC vs LSG : झुकणार नाही जिंकणार, संजीव गोएंकांच्या लखनौचा हिशोब पूर्ण, केएल राहुलचा विजयी षटकार, दिल्लीचा लखनौवर विजय
DC vs LSG : दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं आहे. दिल्लीनं 8 विकेटनं मॅच जिंकली. केएल राहुल अन् अभिषेक पोरेलनं दमदार फलंदाजी केली.

LSG vs DC IPL 2025 लखनौ: आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच झाली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं एटन मारक्रमच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर चांगली सुरुवात केली होती. लखनौनं 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावत 159 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं अभिषेक पोरेल आणि केएल राहुलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं विजय मिळवला. दिल्लीनं लखनौला 8 विकेटनं पराभूत केलं. केएल राहुलनं धोनी स्टाईलनं षटकार मारत मॅच संपवली.
लखनौला एडन मारक्रम आणि मिशेल मार्श यांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. एडन मारक्रमन यानं 52 धावांची खेळी केली. मात्र, लखनौच्या 87 धावा असताना मारक्रम बाद झाला आणि दिल्लीच्या गोलंदाजांनी मॅचवर ताबा मिळवला. लखनौच्या संघाला मोठी धावसंख्या त्यांनी उभारु दिली नाही. मिशेल मार्श 45 धावा करुन बाद झाला. तर, आयुष बदोनीनं 21 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली. यामुळं लखनौ कॅपिटल्सनं 20 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 159 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या मुकेश कुमारनं चार विकेट घेतल्या. मिशेल स्टार्कनं एक, चमीरानं आज 1 विकेट घेतली.
केएल राहुलनं करुन दाखवलं
दिल्ली कॅपिटल्स लखनौला 8 विकेटनं पराभूत केलं. दिल्लीनं ही मॅच 17.5 ओव्हरमध्येच पराभूत केलं. अभिषेक पोरेल आणि केएल राहुल यांनी दिल्ली विजयापर्यंत पोहोचवलं. केएल राहुलनं नाबाद 57 धावा केल्या. यामध्ये त्यानं तीन षटकार मारले. तर, अभिषेक पोरेलनं 51 धावांची खेळी केली. केएल राहुलनं आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे केएल राहुलनं लखनौला त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या तीन हंगामात लखनौचं नेतृत्त्व केएल राहुलनं केलं होतं. या वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल दमदार कामगिरी करत आहे. संजीव गोएंकांच्या लखनौचा षटकार मारत केएल राहुलनं पराभव केला.
दिल्लीचा संघ : अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपरज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार
लखनौचा संघ : एडन मारक्रम, मिशेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (विकेटकीपर/कॅप्टन), अब्दुल समद, डेविड मिलर, शार्दुल ठाकुर, दिग्वेश सिंह राठी, रवि बिश्नोई, आवेश खान, प्रिंस यादव





















